मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लस घ्या आणि मिळवा 10 कोटी रुपये, जाणून घ्या काय आहे ही भन्नाट ऑफर

कोरोना लस घ्या आणि मिळवा 10 कोटी रुपये, जाणून घ्या काय आहे ही भन्नाट ऑफर

एका डेव्हलपरनं लस (Corona Vaccine) घेण्याऱ्यांसाठी एक अनोखी ऑफर (Offer) दिली आहे. यानुसार, जर तुम्ही लस घेतली तर तुम्हाला बक्षीस म्हणून 1.4 मिलियन डॉलर म्हणजेच 10 कोटी इतकी रक्कम मिळू शकते.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 31 मे : केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना महामारीनं (Coronavirus) थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सगळेच देश लसीकरणावर (Corona Vaccination) भर देत आहेत. भारतातही लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, एक असाही देश आहे, जिथे लस घेतलेल्यांना 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचं बक्षीस जिंकण्याची संधी (Covid 19 Vaccine Lottery Offers) दिली जात आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हाँग काँगमध्ये एका डेव्हलपरनं लस घेण्याऱ्यांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. यानुसार, जर तुम्ही लस घेतली तर तुम्हाला बक्षीस म्हणून 1.4 मिलियन डॉलर म्हणजेच 10 कोटी इतकी रक्कम मिळू शकते. मात्र, ही रक्कम कॅशच्या स्वरुपात न देता लॉटरीच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि विजेत्याला या किमतीची अपार्टमेंट गिफ्ट दिली जाईल. जूनमध्ये कोरोनापासून मिळणार मोठा दिलासा? लसीकरणाचा वेगही वाढणार सिनो ग्रुप नावाच्या कंपनीनं टेंक फोंग फाउंडेशनसोबत मिळून लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं ही ऑफर दिली आहे. कंपनीनं म्हटलं आहे, की विजेत्याला ग्रँड सेंट्रल प्रोजेक्टअंतर्गत एक ब्रँड न्यू अपार्टमेंट ऑफर केली जाईल. VIDEO:लहान मुलांना इतकं काम असतं का?ऑनलाईन क्लासबद्दल चिमुकलीची थेट PMकडे तक्रार हाँग काँगमध्ये लस घेतलेले लोक हे लकी ड्रॉ जिंकण्यासाठी पात्र असतील. या ऑफरमध्ये अलिशान घर गिफ्ट म्हणून दिलं जाईल. लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी सरकारकडूनही विविध ऑफर दिल्या जात आहेत. सरकार लसींचे डोस डोनेट करण्याचाही विचार करत आहे, कारण ऑगस्टपर्यंत काही डोस एक्सपायर होणार आहेत. या देशात लसीकरणासाठी लोक घराबाहेरही निघायला तयार नाहीत. जवळपास 75 लाख लोकसंख्या असलेल्या हाँग काँगमध्ये आतापर्यंत केवळ 12 टक्के जनतेनंच लस घेतली आहे. तर, शेजारी देश सिंगापूरमध्ये 28 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या