अख्खं गाव कोरोना पॉझिटिव्ह, तरी त्याचे रिपोर्ट निगेटिव्हच! या गावातील प्रकार पाहून मुख्यमंत्रीही हैराण

अख्खं गाव कोरोना पॉझिटिव्ह, तरी त्याचे रिपोर्ट निगेटिव्हच! या गावातील प्रकार पाहून मुख्यमंत्रीही हैराण

या गावात 52 वर्षांची एक व्यक्ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह होते. या घटनेने हे सिद्ध केले की जर सोशल डिस्टन्सिंग पाळले तर कोरोनाला टाळता येऊ शकेल.

  • Share this:

लाहौल स्पीती, 23 नोव्हेंबर : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीतही देशात अशी काही शहरं आहेत जी कोरोनापासून सुरक्षित आहेत. हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात कोरोनाचा एकही रुग्ण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आढळून आला नाही आहे. मात्र हिमाचलच्या थोरंग गावात एक वेगळाच प्रकार घडला. या गावात 52 वर्षांची एक व्यक्ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह होते. या घटनेने हे सिद्ध केले की जर सोशल डिस्टन्सिंग पाळले तर कोरोनाला टाळता येऊ शकेल.

52 वर्षीय भूषण ठाकूर हे गावातली एकमेव व्यक्ती आहे, ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही. भूषण यांच्या कुटुंबातील सर्व सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. भूषण म्हणाला की, जेव्हा गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हा पासून ते आयसोलेशनमध्ये आहेत. एवढेच नव्हे तर ते स्वत: चं जेवण स्वत: करतात.

वाचा-...तर 2021 च्या सुरुवातीला येणार कोरोनाची तिसरी लाट, WHOने दिला इशारा

लाहौल-स्पितीचे सीएमओ डॉ. पालोजोर म्हणाले की, कदाचित भूषणची प्रतिकारशक्ती खूप मजबूत आहे. संपूर्ण गावचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना केवळ भूषणचा यांना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं मुख्यमंत्रीही चकित झाले आहे.

वाचा-कोरोनाच्या लशीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, अमेरिकेत 11 डिसेंबरपर्यंत मिळणार लस

लाहौल-स्पिती जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त पंकज राय म्हणाले की, या गावात सुमारे 160 लोक राहतात, मात्र बर्फवृष्टीनंतर बरेच लोक कुल्लू येथे गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच गावातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर, गावातील सर्व 42 लोकांनी स्वेच्छेने कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. भूषण वगळता इतर सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

Published by: Priyanka Gawde
First published: November 23, 2020, 10:14 AM IST

ताज्या बातम्या