मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /COVID-19: राज्याला सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे हादरे, आज उच्चांकी 5493 रुग्णांची भर

COVID-19: राज्याला सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे हादरे, आज उच्चांकी 5493 रुग्णांची भर

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात संख्या वाढणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात संख्या वाढणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात संख्या वाढणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

    मुंबई 28 जून: अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत झापाट्याने वाढ होत आहे. आज आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5493 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626वर गेला आहे. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला आहे.

    60 मृत्यू गेल्या 48 तासातले आहेत तर उर्वरित मृत्यू मागील काही काळातले आहेत. राज्यात मृत्यू दर 4.51 टक्के आहे. मुंबईत रुग्णसंख्येने 28 हजारांचा आकडा पार केला आहे.

    दरम्यान कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

    BIG NEWS: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा Lockdown होणार!

    नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात HOT SPOT आहे त्या भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनलॉक झालं असलं तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

    चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण

    'राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका' असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. परंतु, ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात लॉकडाउन लागू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना प्लाझमा दान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

    First published:

    Tags: Coronavirus