सतत उचक्या येणं आता कोरोनाचं लक्षण? 'त्या' एका रुग्णामुळे डॉक्टरही घाबरले

सतत उचक्या येणं आता कोरोनाचं लक्षण? 'त्या' एका रुग्णामुळे डॉक्टरही घाबरले

सुरुवातील सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची लक्षणं होती. मात्र आता आणखी एक कोरोनाचं लक्षण समोर आलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 12 ऑगस्ट : कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडाही आता 23 लाखांहून अधिक झाला आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ कोरोनाच्या बदलत्या रुपाचा अभ्यास करत आहे. सुरुवातील सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची लक्षणं होती. मात्र आता आणखी एक कोरोनाचं लक्षण समोर आलं आहे. अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मते उचकी येणे हे ही एक कोरोनाचं लक्षण असू शकते.

अमेरिकेतील जर्नल ऑफ इमर्जंसी मेडिसीनच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार एका 62 वर्षीय रुग्णाला सलग चार दिवस उचक्या लागत होत्या. त्यानंतर या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. डॉक्टरांच्या मते या रुग्णाला सुरुवातीला कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते, याशिवाय कोणता आजारही नव्हता. मात्र सलग चार दिवस उचकी येत असल्यामुळे या रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याच्या फुफ्फूसाला सूज असल्याचे दिसून आले.

वाचा-रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा

त्यानंतर या व्यक्तीला ताप येऊ लागला, आणि हळूहळू कोरोनाची इतरही लक्षणं दिसू लागली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी करण्याचे ठरवले. कोरोना चाचणी केल्यानंतर या व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर खरच उचकीमुळे त्याला कोरोना झाला का? याचा अभ्यास शिकागोमधील काही तज्ञ्जांनी केली. यात असे दिसून आले की, सतत येणाऱ्या उचकीमुळे य़ा व्यक्तीच्या फुफ्फूसांना सूज आली होती. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

वाचा-102 दिवसांनी न्यूझीलँडमध्ये कोरोनाची पुन्हा एंट्री; लोकल ट्रान्समिशनमुळे चिंता

तज्ज्ञांच्या मते उचकीमुळे कोरोना होण्याचे हे पहिले प्रकरण आहे. त्यामुळे अद्याप याबाबत ऑोस माहिती मिळालेली नाही आहे. या व्यक्तीची सिटी-स्कॅन केल्यानंतर त्याच्या फुफ्फूसाला सूज आल्याचे दिसून आले. त्यामुळे जर तुम्हाला सतत उचकी येत असेल तर काळजी घ्या.

Published by: Priyanka Gawde
First published: August 12, 2020, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading