Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा! TOCIRA जेनेरिक औषधाला मंजुरी, स्वस्तात उपचार होणार

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा! TOCIRA जेनेरिक औषधाला मंजुरी, स्वस्तात उपचार होणार

टॉसिलिझुमॅब (Tocilizumab) म्हणजे TOCIRA या कोरोनावरील जेनेरिक औषधाच्याआपात्कालीन वापराला डीजीसीआयने (DCGI) मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : कोरोना (Covid-19) विषाणू महामारीविरुद्धचा जगभरातला लढा सुरूच आहे. दुसऱ्या लाटेनंतर आपल्या नागरिकांचा तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं सज्ज झाली आहेत. या प्रामुख्यानं लसीकरणावर भर दिला जात असून त्याचा वेग वाढवला जात आहे. लसीकरणाचं (Vaccination) प्रमाणं चांगलं आहे त्यामुळे सार्वजनिक व्यवहारही सुरू झाले आहेत. याच काळात कोविड-19 च्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पेशंटसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. डीजीसीआयनं (DCGI) हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड-19 च्या रुग्णांना आपात्कालीन परिस्थितीत टॉसिलिझुमॅब  (Tocilizumab) म्हणजेच TOCIRA या जेनेरिक औषध देण्याची परवानगी दिली आहे. हे औषध तयार करणाऱ्या हेटेरो ग्रुपमधील कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे डीजीसीआयने आणीबाणीच्या काळात औषध वापरायला परवानगी दिल्याची माहिती दिली आहे. फक्त प्रौढ रुग्णांनाच हे औषध दिलं जाणार आहे. ज्या रुग्णांना सिस्टिमॅटिक कॉर्टिकोस्टेरॉइड, ऑक्सिजन सप्लिमेंट, एक्स्टा कॉर्पोरल मेमरेन ऑक्सिजनेशन (ECMO) ची गरज आहे तसंच ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायची गरज आहे अशांना टॉसिलिझुमॅब हे औषध दिलं जाऊ शकतं असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हे वाचा - तुम्हाला दिली जाणारी लस खरी की बनावट; अशा पद्धतीनं करा खात्री ‘आमच्या टॉसिलिझुमॅब औषधाच्या वापराला सरकारी संस्थेकडून परवानगी मिळाली याचा आम्हाला आनंद होत आहे. कोविडसाठी तत्कालीन महत्त्वाची उपचार पद्धती विकसित करण्यासाठी आमची असलेली वचनबद्धता आणि ते करून दाखवण्याची आमची तांत्रिक सिद्धता या दोन्ही गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत. हे औषध सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही भारत सरकारसोबत वितरण यंत्रणा राबवू,’ असंही कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉ. बी. पार्थ सारथी रेड्डी म्हणाले,‘ टॉसिलिझुमॅब या औषधाची जगात असलेली कमतरता लक्षात घेता भारतात ते योग्य प्रमाणात वितरित करण्यासाठी सरकारची परवानगी मिळणं खूप महत्त्वाचं आहे. TOCIRA (Tocilizumab) या औषधाचं भारतातलं वितरण आमची सहकंपनी हेटेरो हेल्थकेअर (Hetero Healthcare) करेल. आपलं वितरण जाळं अधिक पक्क करत या औषधाचं वितरण केलं जाईल. कंपनीचा हैदराबादमध्ये असलेला बायोलॉजिक्स विभाग हेटेरो बायोफार्मा तिथल्या प्लँटमध्ये औषधाचं उत्पादन करेल. बायोसिमिलरचं व्हर्जन टोसिरा आहे ते सप्टेंबर संपेपर्यंत भारतात सगळीकडे उपलब्ध होईल.’ हे वाचा - Corona Vaccine घेतल्यावर दिसली ही लक्षणं तर सावधान; सरकारनं दिला इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन 4.04 लाखांवर आली आहे. या रुग्णांपैकी जे प्रौढ आहेत आणि ज्यांना गरज आहे अशा रुग्णांना हे जेनेरिक औषध देता येईल.
First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus

पुढील बातम्या