नवी दिल्ली, 21 जानेवारी : Omicron या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकडे कोरोनाची तिसरी लाट म्हणून पाहिले जात आहे. भारताबाबतच बोलायचे झाले तर येथे दररोज येणाऱ्या केसेसची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. 20 जानेवारी रोजीच भारतात कोरोनाचे 3 लाख 47 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. आजमितीला देशात 20 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये या आश्चर्यकारक वाढीमुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगाला कोरोनाने वेठीस धरले आहे. सध्या विषाणूच्या संसर्गाच्या वाढीसाठी कोरोनाचा नवीन प्रकार Omicron कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार पूर्वीच्या SARS-CoV-2 स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे, कारण इतर प्रकारांच्या तुलनेत याची गंभीरता कमी आहे. हा प्रकार वैद्यकीयदृष्ट्या देखील व्यवस्थापित केला (14 Symptoms of Corona New Variant Omicron) जाऊ शकतो.
तज्ञांच्या मते, आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकाराबद्दल असे म्हटले गेले आहे की, यामुळे वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. यामुळे रुग्णामध्ये थंडी वाजून येण्यासारखी सौम्य लक्षणे निर्माण होतात आणि फुफ्फुसांचे कमी नुकसान होते. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.
हे वाचा - Hemoglobin : या गोष्टी खाऊन राहा Tension free; रक्तात हिमोग्लोबीनचं प्रमाण राहील एकदम उत्तम
लक्षणांविषयी जाणून घ्या
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यूकेच्या ZOE COVID Study मधील डेटा वापरून, बिझनेस इनसाइडरने अलीकडेच ओमिक्रॉनविषयी सर्वात कमी आणि सर्वात जास्त लक्षणे दर्शविणारा एक चार्ट जाहीर केला आहे. हा चार्ट पाहून आपल्याला जाणवणारी लक्षणे ओमिक्रॉनची आहेत, की नाहीत याविषयी जाणून घेता येईल.
हे वाचा - तुम्हाला माहीत आहे का, चित्रपटाच्या शुटींगनंतर हिरो-हिरॉईनच्या कपड्यांचं काय होतं?
Omicron ची 14 लक्षणं (सर्वात कमी-सर्वात जास्त)
वाहणारे नाक: 73%
- डोकेदुखी: 68%
- थकवा: 64%
- शिंका येणे: 60%
- घसा खवखवणे: 60%
- सततचा खोकला: 44%.
- कर्कश आवाज: 36%
- थंडी वाजून येणे किंवा थरथरणे: 30%
- ताप: 29%
- चक्कर येणे: 28%
- मेंदूचे धुके: 24%
- स्नायू दुखणे: 23%
- वास कमी होणे: 19%
- छातीत दुखणे: 19%
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health Tips, Omicron