मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Recover: कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर काळजी नको; या पद्धतींनी घरीच व्हाल ठणठणीत बरे

Corona Recover: कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर काळजी नको; या पद्धतींनी घरीच व्हाल ठणठणीत बरे

Health News:  सौम्य लक्षणे (corona Mild symptoms) असलेल्या कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज नाही. बहुतेक रुग्ण घरीच बरे होत आहेत, कोविडच्या सौम्य लक्षणांच्या वेळी संसर्गाबाबत जागरूक राहून आपण त्याचे गंभीर परिणाम टाळू शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण (coronavirus) सापडत आहेत. परंतु यावेळच्या कोरोना संसर्गाचा ट्रेंड पाहिल्यास तुम्हाला असे दिसून येईल की, संक्रमित रुग्णांच्या संख्येऐवजी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या (Corona Recovery rate) जास्त आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे. यासोबतच सौम्य लक्षणे (corona Mild symptoms) असलेल्या कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज नाही. बहुतेक रुग्ण घरीच बरे होत आहेत, कोविडच्या सौम्य लक्षणांच्या वेळी संसर्गाबाबत जागरूक राहून आपण त्याचे गंभीर परिणाम टाळू शकतो. याचे दोन फायदे होतील, एक म्हणजे आपण कोविडचे गंभीर परिणाम टाळू शकू, दुसरे म्हणजे, यामुळे रुग्णांचा रुग्णालयांवरचा भार कमी होऊ शकतो, जेणेकरून गरज भासल्यास अधिक गंभीर रुग्ण रुग्णालयात उपचार घेऊ शकतील.

डॉ. विकास भाटिया, संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बीबीनगर म्हणतात की, कोविडच्या या लाटेतही आपल्याला संयम आणि धीरानं घ्यावं लागेल. यावेळी कोविडची सौम्य लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले अधिक रुग्ण दिसत आहेत. जर, कुटुंबातील कोणाचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर, स्वत:ला पूर्णपणे विलगीकरणात ठेवा. साध्या सावधगिरी बाळगल्यास आणखी कोणाला संक्रमण न होता दोन ते तीन दिवसांचा ताप बरा होऊ शकतो. तुम्ही संक्रमित झाल्याचं आढळलं असेल तरीही घाबरण्याची गरज नाही. तुमची लक्षणं ओळखा आणि सरकारनं जारी केलेल्या सुधारित गृहविलगीकरण मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करा.

कोविडच्या दुसर्‍या लाटेत, असं दिसून आलं की, हलकी लक्षणं असलेले रुग्णही घाबरून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले. ज्यामुळं अधिक गंभीर आणि गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड मिळू शकले नाहीत.

हे वाचा - Carrot Leaves Benefits : थंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का?

डॉक्टर भाटिया म्हणतात की, सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात जाण्याऐवजी सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन घरीच केलं तर गंभीर बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळू शकतील. त्यामुळं रुग्णालयांवरील ताण कमी होईल. डॉ. विकास भाटिया म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून कोविड-अनुरूप वर्तनाचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. बहुतेक लोकांना आता कोविड-अनुरूप वर्तनाची सवय झाली आहे. या वेळीही पूर्वीप्रमाणेच वागावं लागेल. अत्यावश्यक असेल, तेव्हाच घरातून बाहेर पडा. साबणानं नियमित हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. जेव्हा घराबाहेर पडाल, तेव्हा चेहरा मास्कनं व्यवस्थित झाकून बाहेर पडा.

हे वाचा - Avoid Pigmentation: चेहऱ्यावर सुरकत्या येणारच ना! त्यासाठी या चुका अगोदर टाळाव्या लागतील

बाहेरून घरात प्रवेश करतानाही लक्षात ठेवा की, संपर्कात आलेल्या वस्तू निर्जंतुक केल्या पाहिजेत. मास्क नियमित बदलत राहा. या वेळीही संक्रमण टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तनाची सवयच आम्हाला सुरक्षित ठेवेल.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus