• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनातून बरं झालेल्यांना गंभीर आजारांचा धोका; TB टेस्ट गरजेची, आरोग्य मंत्रालयानं केलं सावध

कोरोनातून बरं झालेल्यांना गंभीर आजारांचा धोका; TB टेस्ट गरजेची, आरोग्य मंत्रालयानं केलं सावध

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार, कोरोनाबाधित व्यक्तीला टीबीचा धोका अधिक वाढतो. याची दररोज अनेक नवीन प्रकरणं समोर येत असल्यानं डॉक्टरही चिंतेत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 18 जुलै : कोरोना (Coronavirus) महामारीचं संकट अजूनही टळलेलं नाही. जगभरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. अशातच आता कोरोनामुळे इतरही गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार, कोरोनाबाधित व्यक्तीला टीबीचा धोका अधिक वाढतो. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की 2020 मध्ये कोरोनाविरोधातील प्रतिबंधांमुळे टीबीच्या (Tuberculosis) प्रकरणांमध्ये जवळपास 25 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, आता समोर येत असलेल्या काही बातम्यांनी चिंता वाढवली आहे. Ivermectin: कोरोनाच्या उपचारासाठी तुम्ही घेतलं होत्या का या गोळ्या? नवा वाद सुरू आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये टीबीची प्रकरणं अचानक वाढत असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. दररोज अनेक नवीन प्रकरणं समोर येत असल्यानं डॉक्टरही चिंतेत आहेत. आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व कोरोना रुग्णांना टीबी टेस्ट आणि टीबी रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कोरोनातून दिलासा तर नाहीच मात्र अडचणीत आणखीच वाढ झाल्याचं चित्र आहे. लशींचे दोन्ही डोस घेऊनही होतेय कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं कारण कोरोनातून बरं झालेल्यांना असलेला टीबीचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयानं असं म्हटलं आहे, की SARS-COV-2 संक्रमण एखाद्या व्यक्तीसाठी टीबीचा धोका वाढवू शकतं. मात्र, कोरोनामुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे अद्याप ठोस आणि पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनातून बरं झालेल्यांनी टीबीची चाचणी करून घेणं गरजेचं आहे, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: