मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona: भारतात मृतांच्या अधिकृत आकड्यापेक्षा परिस्थिती आणखी भयानक? NYT च्या रिपोर्टवर सरकारचा मोठा खुलासा

Corona: भारतात मृतांच्या अधिकृत आकड्यापेक्षा परिस्थिती आणखी भयानक? NYT च्या रिपोर्टवर सरकारचा मोठा खुलासा

वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला होता, की भारतातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) मृत्यूचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या खूप अधिक आहे.

वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला होता, की भारतातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) मृत्यूचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या खूप अधिक आहे.

वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला होता, की भारतातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) मृत्यूचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या खूप अधिक आहे.

नवी दिल्ली 28 मे : इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये दाखवण्यात आलेला भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा (Covid Deaths in India) खोटा आणि निराधार असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे. वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला होता, की भारतातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) मृत्यूचा आकडा अत्यंत कमी दाखवला जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या खूप अधिक आहे. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे, की देशात कोरोना रुग्णसंख्येत मागील वीस दिवसांपासून घट होत आहे. 24 राज्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली गेली आहे.

नीति आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले, “एनवायटीचा अहवाल कोणत्याही पुराव्यांचा आधारावर बनवला गेला नाही आणि हा चुकीच्या अंदाजांवर आधारित आहे. ते म्हणाले की असं असू शकतं, की ,सध्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्ह लोकांची तुलनेत संख्या खूप जास्त असू शकते. मात्र, मृतांच्या आकड्याबाबत हे होणार नाही. त्यांनी म्हटलं, की मृतांच्या आकड्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मजबूत ट्रॅकींग सिस्टम काम करत आहे. त्यामुळे, या नावाजलेल्या वृत्तपत्रानं अशा प्रकारचं वृत्त प्रकाशित करणं चुकीचं आहे.

भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख पॉल म्हणाले, की मृत्यूच्या प्रकरणांची नोंद होण्यात काही प्रमाणात उशीर होऊ शकतो. मात्र, हे आकडे लपवण्याचा केंद्राचा कोणताही हेतू नाही. जर मी हेच मापदंड न्यूयॉर्कच्या बाबतीत लागू केलं तर मृतांचा आकडा ५० हजार होईल. मात्र, हा आकडा ते १६ हजारच सांगतात. न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या आर्टिकलमध्ये म्हटलं होतं, की भारतात दाखवण्यात येत असलेला मृतांचा अधिकृत आकडा तीन लाख आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा तीन पट अधिक असण्याची शक्यता आहे.

पॉल यांनी सांगितलं, की आमच्याकडे एकूण बाधितांपैकी मृतांचा आकडा 0.05 टक्के आहे. मात्र, ते म्हणतात की आकडा 0.3 टक्के आहे. कोणत्या आधारावर तुम्ही हे ठरवलं, असा प्रश्नही पॉल यांनी उपस्थित केला आहे. पाच लोकांनी एकत्र बसत एकमेकांना फोन केले आणि हे आकडे तयार केले, असंही ते म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोनानं 3 लाख 18 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus cases