Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाची प्रकरणं कितीही वाढली तरी मृत्यूच्या आकड्यावर नियंत्रण शक्य; तज्ज्ञांनी सांगितला मार्ग

कोरोनाची प्रकरणं कितीही वाढली तरी मृत्यूच्या आकड्यावर नियंत्रण शक्य; तज्ज्ञांनी सांगितला मार्ग

देशात कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढली तरी मृत्यूचा (corona patient death) आकडा 8 हजारांच्या आतच रोखता येऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : भारतात (india) कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं 1 लाख 45 हजारांपेक्षा जास्त आहेत. 60 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर काय होईल याची चिंता सर्वांना लागली आहे. मात्र कोरोनाव्हायरसची प्रकरणं कितीही वाढली तरी मृत्यूवर नियंत्रण ठेवणं शक्य आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थचे डायरेक्टर प्राध्यापक जी. व्ही. एस. मूर्ती यांच्या मते, देशातील मानक मापदंडांचं सक्तीने पालन आणि सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवून मृत्यूचा आकडा आठ हजारांच्या आतच रोखता येऊ शकतो. मूर्ती यांनी सांगितलं की, "देशात कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्याचा विचार केला, तर वेगवेगळ्या परिस्थितीनुसार लढावा लागेल. कारण देशातील वेगवेगळी राज्य आणि जिल्ह्यातील लोकसंख्या वेगवेगळी आहे, आरोग्य व्यवस्था वेगळी आहे, देशाच्या वेगवेगळ्या भागात साक्षरतेचं प्रमाणही वेगळं आहे. त्यामुळे आपल्याला जिल्हा आणि राज्य स्तरावर वाढत असलेल्या प्रकरणांबाबत विचार करायला हवा" हे वाचा - WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर? "महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये देशातील एकूण प्रकरणांपैकी जवळपास 70 टक्के प्रकरणं आहेत. जोपर्यंत या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचं प्रमाण एका विशिष्ट स्तरावर पोहोचत नाही, तोपर्यंत देशातही पोहोचणार नाही. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये व्हायरस अशा टप्प्याच्या जवळ आहे. जूनच्या सुरुवातीला किंवा जुलैच्या मध्यात हा टप्पा येऊ शकतो", असं मूर्ती म्हणालेत. "देशात लॉकडाऊन लागू झाल्याने 80 हजार ते एक लाख मृत्यू टाळता आले, असे पुरावे मिळालेत. गेल्या एका आठवड्यात दरदिवशी होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीनुसार प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 2 मृत्यू होत आहेत. कित्येक राज्यांनी आपल्या आरोग्य सेवा वाढवल्यात, ज्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.  देशातील मानक मापदंडांचं सक्तीने पालन आणि सर्व रुग्णांलयांना हाय अलर्टवर ठेवलं तर कोरोनामुळे होणारे मृत्यू 7500 ते 8000 च्या आतच रोखता येऊ शकता. अशात देशातील प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 4 ते 5 मृत्यूच होतील", असा दावा मूर्ती यांनी केला आहे. हे वाचा - सावध राहा! कोरोनाचा दुसरा टप्पा असू शकतो जास्त धोकादायक, WHOचा इशारा कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या