'मी कोरोना लस घेणार नाही कारण...', सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होताच या आरोग्यमंत्र्यांना मोठा खुलासा
कोरोना लशीच्या (Corona vaccine) ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या या आरोग्यमंत्र्यांनी (health minister) प्रत्यक्ष लसीकरणात (corona vaccination) लस घेण्यास मात्र नकार दिला आहे.
चंदीगड, 01 मार्च : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण (Covid-19 Vaccination) मोहीम सुरू झाली आहे. 65 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी आणि ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस दिली जाते आहे. सर्वसामान्यांना लस उपलब्ध झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi vaccinated) यांनी लस घेतली. याशिवाय काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही लस घेतली आहे. असं असताना हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी (Haryana Health Minister Anil Vij) मात्र लस घेण्यास नकार दिला आहे.
अनिल वीज हे कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते. ट्रायलमध्ये त्यांनी कोरोना लस घेतली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात लसीकरण सुरू झालं आहे, तेव्हा मात्र त्यांनी लस घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे आणि याचं कारणही दिलं आहे.
आज आम जनता के लिए कोरोना वैक्सीन शुरू होने जा रही है । सब को निस्संकोच लगवानी चाहिए । मैं तो नही लगवा पाऊंगा क्योंकि कोविड होने के बाद मेरी एंटीबाडी 300 बनी है जोकि बहुत ज्यादा है । शायद मैंने जो ट्रायल वैक्सीन लगवाई थी इसमे उसका भी योगदान हो । मुझे अभी वैक्सीन की जरूरत नही है ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) March 1, 2021
अनिल वीज यांनी ट्वीट करून आपण लस का घेणार नाही, याचं कारण दिलं आहे. ते म्हणाले, आज सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. निसंकोचपणे लस घ्या. मला लस घेता येणार नाही कारण कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर माझ्या शरीरातील अँटिबॉडी 300 झाल्या आहेत आणि या भरपूर आहेत. कदाचित ट्रायलमध्ये मी लस घेतली त्यामुळे माझ्या शरीरातील अँटिबॉडी वाढल्या असाव्यात. आता मला लस घेण्याची गरज नाही.
अनिल वीज यांनी नोव्हेंबरमध्ये कोवॅक्सिन लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू असताना त्यात सहभागी होऊन लस घेतली होती. त्यांनतर डिसेंबरमध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि त्यानंतर कोरोना लस घेतल्यामुळे त्यांना कोरोना झाला अशा चर्चा सुरू झाल्या. अनिल वीज यांनी आपण कोरोना लशीचा एकच डोस घेतला, दुसरा डोस घेणं बाकी आहे, असं स्पष्टही केलं होतं आणि आता त्यांनी आपल्यावर झालेला लशीचा परिणाम सांगत न घाबरता लस घेण्याचं आवाहनही केलं आहे.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेतली. त्यापाठोपाठ आता दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही कोरोना लस घेतली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik)यांनी स्वतः लस घेऊन आवाहन केलं. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली. "बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफस दिली जाईल." सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून दिली असल्याचं नितीन कुमार यांनी सांगितलं.