नवी दिल्ली 30 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (2nd Wave of Coronavirus) कोरोना रुग्णांमध्ये अनेक नवनवीन आजार आणि लक्षणं दिसून आली. यातीलच एक आहे हॅप्पी हाइपोक्सिया (Happy Hypoxia). दुसऱ्या लाटेदरम्यान हॅप्पी हाइपोक्सियाचा सर्वाधिक प्रभाव तरुण वर्गावर पडला आहे. यामुळे डॉक्टरांची चिंताही वाढली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या तरुणांमध्ये हॅप्पी हाइपोक्सियाचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे.
हॅप्पी हाइपोक्सिया कोरोना रुग्णांचा सायलेंट किलर असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, याच कारण हॅप्पी हाइपोक्सिया असल्याचं मानलं जात आहे. हॅप्पी हाइपोक्सियामुळे कोरोना रुग्णातील लक्षणं दिसून येत नाहीत. मेडिकल एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, हॅप्पी हाइपोक्सियामध्ये रक्तातील ऑक्सिजन लेवल प्रचंड कमी होते मात्र तरीही रुग्णांवर याचा काही परिणाम दिसून येत नाही. रुग्ण सामान्य दिसत असतो मात्र याच कारणामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत जाते.
सेलिब्रेटी लस प्रकरण; ठाणे मनपाकडून चौकशीचे आदेश, तीन दिवसांत येणार सत्य समोर
डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, हॅप्पी हाइपोक्सियानं पीडित असलेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यानंतर शरीराचे बहुतेक अवयव काम करणं बंद करतात. मात्र, रुग्णाला पाहिल्यास असं वाटतं की एकदम व्यवस्थित आहे. मात्र, हॅप्पी हाइपोक्सिया झालेल्या कोरोना रुग्णाची ऑक्सिजन पातळी 40 टक्क्यांपर्यंत खाली येते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पल्स ऑक्सिमीटरसोबतच ब्लड ऑक्सिजन लेवलही तपासा. श्वास घेण्यास त्रास होत नसेल मात्र ताप, खोकला आणि घसा दुखत असेल तरीही सावध राहाणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की हॅप्पी हाइपोक्सियावाल्या रुग्णांमध्ये नेहमीच्या कोरोना लक्षणांशिवाय त्वचेचा रंग लाल होण्याची समस्या उद्भवते. तसंच ओठांचा रंग पिवळा किंवा निळा होईल आणि कोणतंही काम न करताही घाम येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Corona updates, Coronavirus