ग्वाल्हेर, 22 जानेवारी : कोरोना व्हायरसची (Coronavirus) तिसरी लाट (Corona Third Wave) भयावह रूप घेताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे. यादरम्यान ग्वाल्हेर (Gwalior News) जिल्ह्यातून हैराण करणारी बाब समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 5 दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र मुलीचा आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यावेळी हा खुलासा झाला. (Gwalior 5 day old baby dies from corona, Mothers report was negative even the doctor was shocked )
मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती आजारी असल्यानं ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. येथे 2 दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभाग हैराण झाला आहे. मुलीच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे पुन्हा नवा प्रश्न उभा राहिला आहे. आता आरोग्य विभागाकडून अन्य कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट केल्या जात आहे.
हे ही वाचा-शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृत्यू; सकाळी वॉकसाठी पडले होते घराबाहेर
याशिवाय ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन, स्त्री विभागातील एचओडीसह 12 हून अधिक डॉक्टर आणि नर्सेस कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.