मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Gujrat : 71 दिवसांत 1.23 लाख डेथ सर्टिफिकेट जारी, कोरोनामुळे मात्र 4218 मृत्यू; सरकार आकडे लपवतेय?

Gujrat : 71 दिवसांत 1.23 लाख डेथ सर्टिफिकेट जारी, कोरोनामुळे मात्र 4218 मृत्यू; सरकार आकडे लपवतेय?

फोटो-प्रतिकात्मक

फोटो-प्रतिकात्मक

गुजरात सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपविण्याचा आरोप केला जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
गांधीनगर, 14 मे : गुजरातमध्ये वारंवार कोरोना संसर्गाच्या रुग्णसंख्येचा (Gujarat Corona case) कहर वाढत आहे. अहमदाबाद, सूरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या समोर आली आहे. या महानगरांमध्ये स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. आता एका सरकारी विभागाने सरकारच्या कोरोना रुग्णसंख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका रिपोर्टनुसार राज्यात गेल्या 71 दिवसात 1.23 लाख डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. मात्र येथे मृतांचा आकडा 4218 असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षात झालेली मृतांची संख्या आणि जारी केलेल्या डेथ सर्टिफिकेटच्या आकड्यांशी तुलना केली तर ही संख्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे. गुजराती वृत्तपत्र दिव्य भास्करने 1 मार्च 2021 ते 10 मे 2021 पर्यंत डेथ सर्टिफिकेटच्या डेट्याच्या आधारावर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातील 33 जिल्हे आणि 4 नगरपालिकेद्वारे 71 दिवसात आतापर्यंत 1,23,871 डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. या वर्षाच्या मार्च महिन्यात राज्यात एकूण 26,026 डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये ही संख्या वाढून 57,796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 40,051 पर्यंत पोहोचली आहे. हे ही वाचा-Sputnik भारतात नवी लस उपलब्ध; कुणाला मिळाला पहिला डोस, किंमत किती, जाणून घ्या गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदाचे आकडे भीतीदायक आता गेल्या वर्षांपेक्षा यंदाच्या डेथ सर्टिफिकेट जारी होणाऱ्या आकड्यांशी तुलना केली तर मार्च 2020 मध्ये 23,352, एप्रिल 2020 मध्ये 21,591 आणि संपूर्ण मे 2020 मध्ये 13,125 मृत्यू दाखल करण्यात आली होती. म्हणजे या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे. मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोविडमुळे या 71 दिवसात केवळ 4218 मृत्यू झाले आहेत. टीव्ही 9 आकड्यांनुसार मार्च, एप्रिल आणि मे 2021 मधील 71 दिवसात सर्वाधिक मृत्यू हायपरटेंन्शनमुळे झाले आहेत. यापैकी 80 टक्के मृत्यू असे आहेत, जे अन्य आजारांशी लढत होते. यापैकी 28 टक्के कोरोनाचे रुग्ण डायबिटीज, किडणी आणि लिव्हरशी संबंधित आजारांनी ग्रासलेले होते. कोरोना मृतकांमंध्ये 4 टक्के रुग्ण असे आहेत जे कोरोनातून बरे झाले होते. या आजारातून बरे झाल्यानंतर ब्लड क्लॉटिंगमुळे हार्ट अटॅकमुळे अनेकांना मृत्यू ओढवला आहे. या एकूण मृतांमध्ये 60 टक्के रुग्ण 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते, तर 20 टक्के 25 वर्षांपेक्षा कमी होते. गुजरात सरकारवर वारंवार कोरोनामुळ होत असलेल्या मृतांचे आकडे लपविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी यावर खुलासा दिला होता. यावर ते म्हणाले होते की, सरकार कोणतेही आकडे लपवित नाही. कोमॉर्बिडमुळे मृत्यू झालेल्यांचे आकडे कोरोनाच्या मृत्यूंमध्ये सामील करण्यात आलेले नाहीत. सरळ शब्दात सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल आणि त्यातच तिला मधुमेह, हार्ट वा किडनीशी संबंधित गंभीर आजारांनी ग्रस्त असेल तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं मानलं जात नाही.
First published:

Tags: Corona patient, Corona updates, Gujrat

पुढील बातम्या