Home /News /coronavirus-latest-news /

Corona Virus: कोरोनाशी लढाई अखेर जिंकलीच! तब्बल 202 दिवस रुग्णालयात उपचार घेऊन ती परतली घरी

Corona Virus: कोरोनाशी लढाई अखेर जिंकलीच! तब्बल 202 दिवस रुग्णालयात उपचार घेऊन ती परतली घरी

कोरोनाची बाधा झालेली 45 वर्षीय महिला तब्बल 202 दिवस रुग्णालयात होती. कोरोनाची बाधा (Corona Infection) झाली असली तरी या महिलेनं 202 दिवस धीरानं या विषाणूचा सामना करून सुखरुप घरी परतली.

    दाहोद, 20 नोव्हेंबर : कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत असली तरी काळजी घेणं गरजेचं आहेच. ज्या कुटुंबांनी कोरोनाची (Corona Virus) भीषण दाहकता अनुभवली त्यांच्यासाठी ते दिवस आठवले तरी भीती वाटते. अशाच प्रकारच्या एका घटनेत कोरोनाची बाधा झालेली 45 वर्षीय महिला तब्बल 202 दिवस रुग्णालयात होती. कोरोनाची बाधा (Corona Infection) झाली असली तरी या महिलेनं 202 दिवस धीरानं या विषाणूचा सामना करून सुखरुप घरी परतली. गुजरातमधील दाहोद येथील एका 45 वर्षीय महिलेला दाखल केल्यानंतर 202 दिवसांनी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. या महिलेला 1 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. महिलेच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. गीता धार्मिक असे या महिलेचे नाव आहे. तिचे पती दाहोदमध्ये रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत भोपाळहून परतल्यानंतर गीता यांना विषाणूची लागण झाली. कोरोनावरील उपचार करण्यासाठी त्यांना 202 दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले आणि दाहोद रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - अमरावतीत दंगल पेटली होती अन् मुस्लिम बांधव शंकराच्या मंदिराचे रक्षण करत होते! घरी उत्साहात स्वागत महिलेचे पती त्रिलोक धार्मिक यांनी सांगितले की, "शुक्रवारी दाहोद रेल्वे रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे घरी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. गीता यांना दाहोद आणि वडोदरा येथे एकूण 202 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यांचे पती त्रिलोक रेल्वेत अभियंता म्हणून काम करतात. हे वाचा - Winter Care: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी अंजीर आणि दूध प्या; मिळतील जबरदस्त फायदे नऊ वेळा असं वाटलं की आता सगळं संपलं त्रिलोक धार्मिक यांनी सांगितले की, हा काळ आमच्यासाठी खूप बिकट होता. या 202 दिवसांच्या काळात नऊ वेळा असा प्रसंग आला की, आता काही तरी बरे वाईट होईल. ते म्हणाले की, “माझ्या सासऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर आम्ही 23 एप्रिलला भोपाळला गेलो होतो. 25 एप्रिल रोजी दाहोदला परत आल्यानंतर माझ्या पत्नीला कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागली आणि 1 मे रोजी तिचा चाचणी पॉझिटिव्ह आली. तिची ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि ताप वाढला, 1 मे रोजी रात्री तिला दाहोदला नेण्यात आले. तेथे तिला रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या