मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

7 जन्माची साथ 23 दिवसांमध्ये सुटली, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!

7 जन्माची साथ 23 दिवसांमध्ये सुटली, कोरोनाला हलक्यात घेऊ नका!

कोविड नियमांचे (Corona Protocol) पालन करून लग्न केलेल्या अजयला लग्नाच्या 4 दिवसानंतर कोरोना संसर्ग झाला. लग्नाच्या 23 दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं नववधूसह सर्नांनाच जबर धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

राजगड, 19 मे : कोरोनाला (Corona in india) हलक्यात घेऊ नका, असं तुम्हाला आत्तापर्यंत कोणी-ना कोणी म्हटलं असेल, कारण ज्यांनी आपल्या तरुण मित्राला किंवा तरुण नातेवाईकाला गमावलंय त्यांना कोरोना काय करू शकतो, याचा अंदाज आहे. असेच एक उदाहरण मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर येथून समोर आलं आहे. कोविड नियमांचे (Corona Protocol) पालन करून लग्न केलेल्या अजयला लग्नाच्या 4 दिवसानंतर कोरोना संसर्ग झाला. लग्नाच्या 23 दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं नववधूसह सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. प्रशासनाकडून सामूहिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. आपण या निर्बंधांचे पालन केले पाहिजे, तरच आपण कोरोनाला पराभूत करू शकू.

राजगड जिल्ह्यातील पाचोर शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय अजय शर्माचा 25 एप्रिल रोजी विवाह झाला होता. त्यानंतर चार दिवसांनी 29 एप्रिलला अजयचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातील इतर सदस्यांपैकी एका महिलेची चाचणीही पॉझिटिव्ह आली. अजय पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वप्रथम स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले. परंतु, नंतर त्याला भोपाळ येथे हलविण्यात आले, तेथे एक आठवड्यात व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर अजयचा 17 मे रोजी मृत्यू झाला. विषेश म्हणजे अजयचे लग्न कोरोनाचे सर्व नियम पाळून कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये एका मंदिरामध्ये पार पाडण्यात आले होते.

हे वाचा - Tauktae वादळात मुंबईच्या समुद्र किनाऱ्या लाटांचं तांडव; युजर्सने म्हटलं VIDEO पाहूनच चक्कर येते

अजयचे राजगड जिल्ह्यातील नरसिंगगड ब्लॉकमधील मोतीपुरा गावात राहणाऱ्या अन्नू शर्माशी लग्न झाले होते. अन्नूचे कुटुंबही सीहोरमध्ये राहत आहे. अशा परिस्थितीत लग्न तेथील एका मंदिरात झाले. कुटुंबातील काही निवडक लोक लग्नाला गेले होते. अजयची मेव्हणीचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कुटुंबातील इतर लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोविड प्रोटोकॉलनुसार, भोपाळच्या मुक्तिधाममधील कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांच्या मदतीनं अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामध्ये धोका पत्करून लग्न करणं अजयला चांगलंच महाग पडलं असून आपला जीव गमवावा लागला. जरी त्यांनी सर्व नियमांचे पालन केले असले तरी कुठेतरी निष्काळजीपणा झाला आणि कोरोना शरिरात घुसला.

भावानं केलं कळकळीचं आवाहन, कसलेच कार्यक्रम करू नका

मृताचा भाऊ त्रिलोक शर्मा आणि कुटुंबातील एक व्यक्ती रमाकांत शर्मा म्हणाले की, “आम्ही सर्व नियमांचे पालन करून लग्न पार पाडले होते. परंतु, तरीही कोरोनाची लागण झालीच, आमच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आमची सर्वांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका आणि लग्नासह इतर कोणताही कार्यक्रम सध्या आयोजित करू नका. दरम्यान, सध्या राजगडमध्ये लग्न आणि इतर सामूहिक कार्यक्रमांना बंदी आहे.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus