• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • बाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली घरी पाठवणी

बाशिंग बांधून लग्नासाठी होता तयार; मात्र पोलिसांनी नवरदेवाचीच केली घरी पाठवणी

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

दुसरीकडे नवरी वरातीची आतुरतेने वाट पाहत होती.

 • Share this:
  लखनऊ, 31 जुलै : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातून नवरीला आणण्यासाठी उत्तराखंडला जाण्याची सर्व तयारी झाली होती. नवरदेव आनंदात होता. दुसरीकडे नवरीदेखील वरातीची आवर्जुन वाट पाहत होती. मात्र यादरम्यान असं काही घडलं की, दोघांच्या लग्नात खंड पडला आणि यासाठी कोणीच काहीही करू शकलं नाही. नवरदेव वऱ्हाड्यांसह निघाला खरा मात्र बॉर्डरवरच त्याला पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी तपास केल्यानंतर नवरदेवासह सर्व वरातीला उत्तराखंडमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. जेव्हा नवरीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर तेदेखील बॉर्डरवर पोहोचले. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. यानंतर ते शांत झाले. मात्र पोलिसांनी आता 14 दिवसांनी वरात आणण्यास सांगून नवरदेवाला घरी पाठवून दिलं आहे. हे ही वाचा-बायको रुसल्यानं जावयाचं सासुरवाडीत 'शोले' आंदोलन;विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा मिळालेल्या माहितीनुसार, या वरातीत 40 ते 45 जणं होते. वरातींतील सदस्यांनी कोरोना नियमांचं पालनही केलं होतं. मात्र उत्तराखंड बॉर्डरवर पोहोचलेल्या वरातीला पोलिसांनी रोखलं. उत्तर प्रदेश- उत्तराखंड सीमेवर तैनात आरोग्य विभागाने टीमने तपास सुरू केला. सर्वात आधी नवरदेवाची कोरोना चाचणी करण्यात आली. नवरदेवाचा रिपोर्ट समोर आला त्यानंतर सर्वजण हैराण झाले. नवरदेव नेमका कोरोना पॉझिटिव्ह निघाला. नवरदेवासह गाडीत बसलेल्यांना जेव्हा याबद्दल कळालं, तर त्यांनाही घाम फुटला. यानंतर पोलिसांनी नवरदेवाला घरी जाण्यास सांगितलं. 14 दिवसांनंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर परत येण्याची विनंती केली. दुसरीकडे नवरी वरातीची आतुरतेने वाट पाहत होती. बॉर्डरवर नवरीच्या नातेवाईकांना जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा तेदेखील शांततने घरी परतले. नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यामुळे वरात्यांमध्ये चिंता पसरली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: