COVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश; सोप्या 5 स्टेप्स फॉलो करत हरवा कोरोनाला

COVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश; सोप्या 5 स्टेप्स फॉलो करत हरवा कोरोनाला

केंद्र सरकारने पाच वेगवेगळ्या प्रकारच्या आहारांचा समावेश असलेला दिवसाचा प्लॅन कोविड रुग्णांसाठी अमलात आणण्याचा सल्ला दिला आहे. शासनातर्फे ट्विटरवरून ही माहिती सर्वांसाठी शेअर करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मे : कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती (Corona in India) अतिशय बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधितांना दवाखाने कमी पडू लागल्यानं रुग्णांचा दवाखान्यांकडील लोंढा थांबवण्यासाठी केंद्र सरकार (Central gov of India) प्रयत्नशील आहे. बाधितांना रुग्णालयात भर्ती होण्याची वेळ येऊ नये, प्राथमिक टप्प्यात लोकांचा कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेकडून आपला आहार कसा असावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारने पाच वेगवेगळ्या प्रकारच्या आहारांचा समावेश असलेला दिवसाचा प्लॅन कोविड रुग्णांसाठी अमलात आणण्याचा सल्ला दिला आहे. शासनातर्फे ट्विटरवरून ही माहिती सर्वांसाठी शेअर करण्यात आली आहे. यात समाविष्ट असलेल्या पदार्थांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास तसेच कोविड होऊन गेल्यानंतर येणाऱ्या थकव्यातून बरे होण्यास मदत होणार आहे.

यामध्ये सांगितलेल्या आहारात न्याहारीमध्ये नाचणीचा डोसा किंवा एक छोटे भांडे भरून लापशीचा (porridge) समावेश करावा असे सांगितले आहे तर रात्रीच्या जेवणात खिचडी नक्की असावी असे म्हटले आहे.

हे वाचा - भारतात Vaccineचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी? परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

असा असावा दिवसभराचा आहार :

1. सकाळी सुरुवातीला भिजवलेले बदाम आणि मनुके खावेत. बदामामध्ये प्रथिने आणि मनुक्यांमध्ये लोहतत्त्व मोठ्या प्रमाणात असते.

2. न्याहारीमध्ये नाचणीचा डोसा किंवा एक छोटे भांडे भरून लापशी किंवा ओट्सचा समावेश करावा.

3. गूळ आणि तुपाचा आहारात समावेश करावा किंवा दुपारच्या जेवणानंतर ते खावे. दुपारच्या जेवणात पोळी किंवा भाकरी सोबत यांचा समावेश करता येईल.

4. रात्रीच्या जेवणासाठी खिचडी करावी. यामध्ये सर्व प्रकारची पोषणमूल्ये असतात आणि पचायला हलकी असते. तसेच यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

5. त्यात महत्त्वाचे म्हणजे आहारात पातळ पदार्थांचा समावेश करावा. पाणी भरपूर प्यावे. घरी बनवलेले लिंबूसरबत, ताक दिवसभरात थोडे थोडे पीत राहावे.

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या