मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Serum ने मागितलेली कोविशिल्डचा बूस्टर डोस देण्यासाठी परवानगी; जाणून घ्या सरकारचं उत्तर

Serum ने मागितलेली कोविशिल्डचा बूस्टर डोस देण्यासाठी परवानगी; जाणून घ्या सरकारचं उत्तर

सीरम इन्स्टिट्यूटने डिसेंबरच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज सादर केला होता. यात भारतात लसीचा तिसरा डोस देण्यास परवानगी मागितली गेली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने डिसेंबरच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज सादर केला होता. यात भारतात लसीचा तिसरा डोस देण्यास परवानगी मागितली गेली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने डिसेंबरच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज सादर केला होता. यात भारतात लसीचा तिसरा डोस देण्यास परवानगी मागितली गेली होती.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 11 डिसेंबर : केंद्र सरकारच्या विषय विशेषतज्ञ समितीच्या (Subject Expert Committee) पॅनेलने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची (Serum Institute of India) कोविशील्डच्या (Covishield) तिसऱ्या डोसला (Booster Dose in India) मान्यता देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने डिसेंबरच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज सादर केला होता. यावर विषय तज्ञ समितीने विचार केला आणि आता SII चा हा अर्ज नाकारण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितलं की, तज्ज्ञांनी सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या तिसऱ्या डोसच्या गरजेबाबत अधिक डेटा मागवला आहे.

लसीचा पुरेसा साठा आणि कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसाराचा हवाला देत सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्डचा तिसरा डोस मंजूर करण्याची विनंती केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (SII) सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी अर्जात म्हटलं होतं की भारतात कोविडशील्डची कमतरता नाही आणि नवीन प्रकारांचा उदय लक्षात घेता, ज्यांनी आधीच लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना बूस्टर डोस देण्याबाबत मागणी करत आहोत. ते म्हणाले की ब्रिटनच्या औषध आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक एजन्सीने आधीच AstraZeneca CHADOX1 nCoV-19 लसीचा बूस्टर डोस मंजूर केला आहे.

लस घेताना थेट शेतात पळत सुटली महिला; धाय मोकलून रडतानाचा अजब VIDEO Viral

एका सूत्रानं सांगितलं की, “सीडीएससीओमधील कोरोनावरील विषय विशेषतज्ञ समितीने (एसईसी) एसआयआयच्या अर्जाचे पुनरावलोकन केलं आणि तपशीलवार विचारविमर्श केल्यानंतर पुणे स्थित कंपनीला स्थानिक क्लिनिकल चाचणी डेटा आणि प्रस्ताव प्रदान करण्याची शिफारस केली. सीरमने केलेल्या अर्जात या गोष्टीवर जोर देण्यात आला होता, की कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची प्रकरणे वाढू लागल्याने अनेक देशांनी बूस्टर डोस देणं सुरू केलं आहे.

विषय तज्ञ समितीने बायोलॉजिकल ई फार्मा कंपनीने केलेली विनंतीही नाकारली आहे. यात कोविशील्ड किंवा कोवॅक्सीनचा डोस घेतलेल्या लोकांना कॉर्बेव्हॅक्सचे अतिरिक्त डोस देण्याबाबत उल्लेख होता. हैदराबाद स्थित कंपनीने ऑक्टोबरमध्ये एक निवेदन जारी केलं होतं की अनेक अभ्यासांत हे समोर आलं आहे, की लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्येदेखील अँटीबॉडीजमध्ये घट झाल्याचे दिसून आलं आहे आणि अनेक देशांनी आधीच बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.

लहान मुलांना धोका? राज्यात 3.5 वर्षाच्या मुलाला Omicron ची लागण; नवे 7 रुग्ण

Corbevax ही कोरोना विरुद्ध भारतात बनवलेली तिसरी लस आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लसीचे अतिरिक्त डोस दिले जात आहेत, परंतु भारतात अद्याप बूस्टर डोसबाबत कोणतेही धोरण तयार करण्यात आलेले नाही. अलीकडेच, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित स्थायी समितीच्या बैठकीत, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, दुसरा डोस घेतल्यानंतर निदान ९ महिने बूस्टर डोस घेऊ नये.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine