Good News: कोरोनाच्या संदर्भात आल्या दोन मोठ्या बातम्या; 2020 अखेरीस मिळणार दिलासा!

Good News: कोरोनाच्या संदर्भात आल्या दोन मोठ्या बातम्या; 2020 अखेरीस मिळणार दिलासा!

सर्व जगाला लॉकडाऊनमध्ये (Lockdown) टाकणाऱ्या कोरोनाच्या लसीसंदर्भात (Coronavirus Vaccine) दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत. एक UK आणि एक रशियातून.

  • Share this:

मॉस्को, 2 डिसेंबर: सर्व जगाला लॉकडाऊनमध्ये (Lockdown) टाकणाऱ्या कोरोनाच्या लसीसंदर्भात (Coronavirus Vaccine)  दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)  यांनी पुढच्या आठवड्यापासून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Mass Vaccination) करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सर्व जग कोरोनावरचं औषध शोधत असतांनाच रशियाने ‘स्पुतनिक-V’ (Sputnik V) औषध शोधून बाजी मारल्याचा दावा केला होता. त्याचं मानवी परिक्षणही यशस्वी ठरल्याचा दावाही रशियाने केला होता. हे औषध खुद्द पुतीन यांच्या मुलीलाच दिलं गेल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं.

ब्रिटन ठरला पहिला देश!

यापूर्वी कोरोना व्हायरस लस मंजूर करणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे.

ब्रिटनमधून जगाला दिलासा देणारी बातमी आल्यानंतर काही तासांनी पुतीन यांनी रशियन सरकारला मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आदेश दिल्याने आता 2020 च्या अखेरीस जगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार CORONA VACCINE

पुढच्या वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भारतात 30 कोटी लोकांचं लशीकरण होणार आहे. जुलै 2020 पर्यंत 50 कोटी डोस बनवण्याची आणि 25 कोटी लोकांचं लशीकरण करण्याची योजना आहे.

भारतात निवडणुकीत जसे मतदान केंद्रं असतात तशी कोरोना लशीकरणासाठी केंद्र तयार करण्याचा विचार सरकारचा आहे. विभागनिहाय तयारी केली जाईल. सरकारी किंवा खासगी डॉक्टरांना या मोहीमेची विशेष जबाबदारी सोपवली जाईल. मतदान केंद्रांप्रमाणे टीमही तयार केल्या जातील. लोकांनाही यात सामावून घेतलं जाईल, त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं जाईल.

First published: December 2, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading