मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लशीबाबत चांगली बातमी; दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

कोरोना लशीबाबत चांगली बातमी; दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

जगातील सर्वात मोठी वॅक्सीन उत्पादक कंपनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या प्रोजेक्टमध्ये ब्रिटेनच्या Oxford University ची पार्टनर आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : गेल्या 9 महिन्यांपासून कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) सुरू असलेल्या लढाईदरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भारतीयांना एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. कोरोना काळात तुम्हीदेखील कोरोना लशीची (Corona Vaccine) प्रतीक्षा करीत आहातच. त्यात पुढील महिन्यापर्यंत Covid-19 लशीचे 10 कोटी डोस भारतात दाखल होणार आहेत.

जगातील सर्वात मोठी वॅक्सीन उत्पादक कंपनी पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या प्रोजेक्टमध्ये ब्रिटेनच्या Oxford University ची पार्टनर आहे. आणि ऑक्सफर्ड यूनिव्हसीटी औषध कंपनी एस्ट्राजेनेका (AstraZeneca) सोबत मिळून ही लस तयार करीत आहे.

लशीचे 100 कोटी डोस करणार तयार

सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले की, या लशीचे 100 कोटी डोस तयार करण्यात येईल. ज्यामध्ये 50 कोटी भारतासाठी असतील. याचे सुरुवातीचे उत्पादन भारतासाठी होईल आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला याला अन्य दक्षिण आशियातील देशांना पाठविण्यात येईल. त्यांनी माहिती देताना सांगितले की, अन्य 50 कोटी डोज दक्षिण आशियातील अनेक देशांसाठी तयार केले जाईल. नवी दिल्ली आणि Covax दरम्यान झालेल्या कराराच्या आधारावर ही प्रक्रिया राबविण्यात येईल.

हे ही वाचा-1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य

किती महाग असेल लस?

WHO च्या मदतीमुळे Covax गरीब देशासाठी लस खरेदी करीत आहे. सध्या 4 कोटी डोस तयार झाले आहेत. मीडिया रिपोट्सनुसार जर ही लस शेवटच्या टप्प्यात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी चांगला निकास देऊ शकली तर सीरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारकडून आपात्कालीन परवाना मिळू शकतो. अदार पुनावाला यांनी पुढे सांगितलं की, कंपनी याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच असेल. यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू आहे. लशीच्या सुरक्षेबाबत चिंता करण्याची गरज नाही, मात्र याच्या दूरगामी परिणामांबाबत येत्या 2 ते 3 वर्षांत कळेल.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india