• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • वर्षाअखेरपर्यंत भारतात 8 लशींचे 216 कोटी डोस होणार उपलब्ध; वाचा कोणत्या आहेत त्या लशी?

वर्षाअखेरपर्यंत भारतात 8 लशींचे 216 कोटी डोस होणार उपलब्ध; वाचा कोणत्या आहेत त्या लशी?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

कसं शोधाल व्हॅक्सीनेशन सेंटर ?

शींच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, काही लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 मे : चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातल्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. केपॉल (Dr V. K. Paul) यांनी गुरुवारी (13मे) व्यापक आराखडा मांडला. त्यात आठ लशींचा समावेश असून, त्यापैकी दोन लशींचा सध्या भारतात वापर केला जात आहे. कोविड-19चा (Covid-19) उद्रेक सुरू झाल्यानंतर वर्षभराच्या आत जगभरात शेकडो लशी विकसित करण्यासाठी संशोधन कार्य सुरू झालं. त्या लशी आता प्री-क्लिनिकल, क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत. कोविड-19 व्हॅक्सिन ट्रॅकरच्या माहितीनुसार, जगभरात एकूण 115 लशी विकसित करण्याचं काम सुरू असून, आतापर्यंत त्यातल्या केवळ 14 लशींच्या प्रत्यक्ष वापराला परवानगी मिळाली आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड आणि भारतबायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लशी सध्या भारतात वापरल्या जात असून, स्पुटनिक व्ही ही रशियन लस पुढच्या आठवड्यापासून भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लशींच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, काही लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यात बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लशींसह सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स, भारत बायोटेकची नाकातून देण्यात येणारी लस, जेन्नोव्हा, स्पुटनिक व्ही आदींचा समावेश आहे. हे ही वाचा-ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध? 'ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत भारतात 216 कोटींहून अधिक डोसची निर्मिती भारतीयांसाठी होईल. त्यामुळे जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसं सर्वांना लस उपलब्ध होईल, यात काहीशंका नको,'असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. भारतातल्या लशी कोव्हॅक्सिन (Covaxin) : हैदराबादची भारत बायोटेक कंपनी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यासंस्थांनी मिळून कोव्हॅक्सिन ही इनॅक्टिव्हेटेड कोरोना व्हायरस लस विकसित केली आहे. ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचं चाचण्यांमध्ये आढळलं. इनॅक्टिव्हेट म्हणजे निष्क्रीय केलेले विषाणू या लशीद्वारे शरीरात सोडले जातात. त्यांचं पुनरुत्पादन होऊ शकत नाही आणि त्यांच्यामुळे कोविडची लागणही होऊ शकत नाही. फॉरमॅलिनसारख्या रसायनाचा वापर त्यात केलेला असतो. SARS-CoV-2 या कोरोना विषाणूविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी ही लस शरीरातल्या प्रतिकारयंत्रणेला प्रशिक्षण देते. अॅल्युमिनियमवर आधारित संयुग (अॅडज्युव्हंट) थोड्या प्रमाणात घेऊन त्यासोबत निष्क्रीय विषाणूंचं मिश्रण केलं जातं. अॅडज्युव्हंटमुळे प्रतिकारयंत्रणेचा लशीला दिला जाणारा प्रतिसाद वाढतो. डिसेंबरपर्यंत कोव्हॅक्सिनचे किमान 55 कोटी डोसेस उपलब्ध असतील, असं सरकारने म्हटलं आहे. बायोलॉजिकलई (Biological E) : हैदराबादमधल्या बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीनेविकसित केलेल्याBECOV2Aया प्रोटीन सबयुनिटवर आधारित असलेल्या लशीच्याआपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. काही वेळा कोव्हॅक्सिनप्रमाणे संपूर्ण विषाणूचा वापर न करता शुद्धीकरण केलेले काही तुकडे (प्रोटीन सबयुनिट्स) वापरले जातात. शरीराच्या प्रतिकारयंत्रणेकडून प्रभावी प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने या तुकड्यांची निवड केलेली असते. या तुकड्यांपासून कोविड-19चा संसर्ग असण्याची शक्यता अजिबात नसते. त्यामुळे सबयुनिट व्हॅक्सिन्स अत्यंत सुरक्षित मानली जातात. तसंच, संपूर्ण विषाणू असलेल्या लशींच्या तुलनेत या लशींच्या निर्मितीचा खर्चही कमी असतो. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत बायोलॉजिकल ई ही कंपनी 30 कोटी डोसेसची निर्मिती करणार आहे. हे ही वाचा-Sputnik भारतात नवी लस उपलब्ध; कुणाला मिळाला पहिला डोस, किंमत किती, जाणून घ्या कोविशिल्ड (Covishield) : ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीच्या सहकार्याने व्हायरल व्हेक्टर्ड प्रकारची लस तयार केली. भारतात पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी कोविशिल्ड या नावाने या लशीची निर्मिती करत आहे. व्हायरल व्हेक्टर प्रकारच्या लशींमध्ये अँटीजेन्स नसतात, तर त्यांच्या निर्मितीसाठी शरीरातल्या पेशींचाच वापर केला जातो. मॉडिफाइड व्हायरस म्हणजे सुधारणा केलेला विषाणू (त्यालाच व्हेक्टर असं म्हणतात)वापरून मानवी शरीरात सोडला जातो. त्याच्या आधारे कोविड-19च्या स्पाइक प्रोटीनविरोधात काम करणारी अँटीजेन्स तयार होण्यासाठी जेनेटिक कोड पाठवला जातो. कोरोनाव्हायरस स्पाइक प्रोटीन जीन अॅडेनोव्हायरसच्या (साध्या सर्दीचाकारक विषाणू) दोन प्रकारांमध्ये अॅड करण्यात आलं आहे. त्याद्वारे अँटीजेनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि शरीरात संबंधित विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीमध्येचिम्पाझींमध्ये आढळणाऱ्या अॅडेनोव्हायरसचा वापर करण्यात आला आहे. ऑगस्ट तेडिसेंबर या कालावधीत भारतात75कोटींहून अधिक डोसेसची निर्मिती केली जाणारआहे. स्पुटनिक व्ही (Sputnik V):रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्यागामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने स्पुटनिक व्ही ही नॉन रेप्लिकेटिंग व्हायरलव्हेक्टर लस विकसित केली आहे. दोन डोस घेतल्यानंतर ही लस91.6टक्केप्रभावी ठरत असल्याचं चाचण्यांत आढळलं आहे. Ad5 आणि Ad26 हे मानवात आढळणारेदोन अॅडेनोव्हायरस यात वापरण्यात आले आहेत. ही लस शरीरात दिल्यानंतरलशीतले विषाणू आपल्या शरीरातल्या पेशींत जातात आणि अँटीजेन जीनसह त्यांचंजनुकीय द्रव्य त्या पेशींच्या केंद्रकात पाठवतात. ही प्रोटीन्स आपल्या शरीराचाच एक भाग असल्याचं समजून मानवी शरीरातल्या पेशी अँटीजेनची निर्मिती करतात. डिसेंबरपर्यंत या लशीचे 15.6 कोटी डोसेस भारतात उपलब्ध होणार आहेत. झायडसकॅडिला (Zydus Cadila) :अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला या औषध कंपनीकडूनZyCoV-Dही लशीची निर्मिती करण्यात आली आहे. ही प्लाझ्मिड डीएनए प्रकारचीलस आहे. या लशीत रोगकारक विषाणूचं जनुकीय द्रव्य वापरण्यात आलं आहे.त्यामुळे विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती विकसित होते. झायडस कॅडिला कंपनीडिसेंबरपर्यंत या लशीचे पाच कोटी डोस भारताला पुरवणार आहे. नोव्हाव्हॅक्स(Novavax) :अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनी आणि भारतातील सिरमइन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्यांनी मिळूनNVX-CoV2373हे प्रोटीनसबयुनिट व्हॅक्सिन विकसित केलं आहे. कोव्होव्हॅक्स असं त्या लशीचं नावआहे. बायोलॉजिकल ई या कंपनीच्या लशीप्रमाणेच या लशीची कार्यपद्धती आहे.यामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर पसरूनत्यांना मानवी शरीरातल्या पेशीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात.डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट या लशीचे20कोटी डोसेस भारत सरकारलापुरवणार आहे. जेन्नोव्हा (Gennova) :पुण्यातल्या जेन्नोव्हाफार्मास्युटिकल्सने मेसेंजर आरएनए प्रकारची लस विकसित केली असून,डिसेंबरपर्यंत या लशीचे सहा कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. इंट्रानेझल(Intranasal) :भारत बायोटेक कंपनी अॅडेनोव्हायरस व्हेक्टर्ड इंट्रानेझलव्हॅक्सिनची निर्मिती करणार आहे. ही लस थेट नाकात दिली जाणार आहे.10कोटीडोसेसची ऑर्डर कंपनीला देण्यात आली आहे.
  First published: