ओहियो, 15 मे : अमेरिकेमध्ये (USA) कोरोनाच्या लसीकरणाचे (Corona vaccination) प्रमाण पाहता त्याठिकाणी अनेक निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्याने ते कोरोनामुक्तीच्या (corona free) दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. मात्र, अजूनही अमेरिकेतही काही ठिकाणी लोक कोरोनाच्या लसीकरणाची भीती बाळगून आहेत. त्यांना लसीकरणासाठी तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना, बक्षीसंही (offers for vaccination) जाहीर केली जात आहेत. अमेरिकेच्या ओहियो शहरात (Ohio city) तर लस घेतल्यास 10 लाखांच्या (10 Lakh) बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.
(वाचा-IRCTCची भन्नाट ऑफर; वर्क फ्रॉम होम ऐवजी आता करा वर्क फ्रॉम हॉटेल)
कोरोनाच्या संकटामध्ये एकामागून एक महामारीच्या लाटा येत आहेत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवण्यासाटी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. एवढंच नाहीतर अनेक देशांतर्फे लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना विविध प्रकारच्या ऑफर्सची प्रलोभनंही दिली जात आहेत. त्यात गिफ्ट खाण्यापिण्याच्या गोष्टी इत्यादींचा समावेश आहे. मात्र अमेरिकेतील ओहियो शहराने तर लसीकरणाच्या ऑफरच्या बाबतीत सर्वांनाच मागं टाकलं आहे. तुम्हालाही ते ऐकूण नक्कीच धक्का बसेल.
(वाचा-लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा Vaccine दान करा; WHO नं का दिला असा सल्ला?)
अमेरिकेच्या ओहियो येथील गव्हर्नरने कोरोनाचे लसीकरण करून घेणाऱ्यासाठी तब्बल 10 लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा यासाठी गव्हर्नर माईक ड्वीन यांनी हे जाहीर केलं. 26 मेपासून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. कोरोना रिलीफ फंडातून ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. कोरोनाचा पहिला डोस घेणारे सर्वजण यात सहभागी होऊ शकतील. दर बुधवारी लॉटरीचा ड्रॉ काढला जाणार आहे. त्यात जो जिंकेल त्याला 10 लाखाचे बक्षीस मिळेल.
गव्हर्नल माईक ड्वीन म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी या माध्यमातून प्रेरणा मिळेल. यापूर्वी अमेरिकेतही न्यूयॉर्क सिटीच्या मेयरनी कोरोनाचे लसीकरण करून घेणाऱ्यासाठी मोफत बर्गर देण्याची घोषणा केली होती. देशाला कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व समजल्याने सरकार अशाप्रकारे प्रयत्न करत आहे. त्यामुळं आपणही लवकरात लवकर लसीकरण करून घेऊन या संकटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Sanjeevani, USA