मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा कडक लॉकडाऊन

ख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा कडक लॉकडाऊन

वर्षातील शेवटचा मोठा सण असलेल्या ख्रिसमसवरही (Christmas) कोरोनाची काळी सावली पडली आहे. युरोपातील (Europe) या देशात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

    बर्लिन, 14 डिसेंबर: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामध्ये 2020 हे संपूर्ण वर्ष संपत आलं आहे. आता वर्ष संपण्यास अवघे काही दिवस असूनही कोरोनाची (COVID19) भीती संपलेली नाही. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या व्हायरसवर (Virus) रामबाण औषध ( Covid vaccine) येईपर्यंत ही भीती कायम राहणार आहे. या वर्षातील शेवटचा मोठा सण असलेल्या ख्रिसमसवरही (Christmas) कोरोनाची काळी सावली पडली आहे. युरोपातील (Europe) जर्मनी (Germany) या देशात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल (Angela Markela) यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले. कधी आहे लॉकडाऊन? जर्मनीत 16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 असा 25 दिवस लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर 10 जानेवारीनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. जर्मनीत या काळात अत्यावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानं, शाळा तसंच लहान मुलांसाठी असलेले डे-केअर बंद असतील. जर्मनीतील रेस्टॉरंट आणि बार हे आधीपासूनच बंद आहेत. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (Work from home) परवानगी द्यावी अशी सूचना सरकारनं केली आहे. मार्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. जर्मनीत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 20 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली असून 321 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशात फटाके उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही घरामध्ये दोन कुटुंबामधील पाच पेक्षा जास्त सदस्यांना एकत्र येण्यासही मनाई आहे. ख्रिसमसच्या काळात म्हणजेच 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान हा नियम शिथिल असेल. “जर्मनीतील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला असून हा ताण कमी करण्यासाठी कठोर उपाय करणे आवश्यक होते,’’ असं मत मार्केल यांनी व्यक्त केले. जर्मनीतील काही राज्यांनी यापूर्वीच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या