Home /News /coronavirus-latest-news /

Corona vaccine घेतल्याने 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

Corona vaccine घेतल्याने 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी कोरोना लसीकरण सेंटरवरूनच ताब्यात घेतलं.

    बर्लिन, 04 एप्रिल : कोरोनाच्या महासाथीला रोखण्यासाठी सर्वात मोठं हत्यार आहे ते कोरोना लस (Corona vaccination). म्हणूनच जगभरात कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. लस घेणाऱ्यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दिलं जातं आहे. असं असताना एका 60 वर्षांच्या व्यक्तीला मात्र कोरोना लस घेणं महागात पडलं आहे (Man take multiple Corona vaccination). कोरोना लस घेतली म्हणून या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जर्मनीतील ही 60 वर्षांची व्यक्ती. एडिनबर्गमध्ये कोरोना लसीकरणाच्या रांगेत उभं असताना पोलिसांनी त्याला पकडलं (German man takes 90 Covid Vaccine Dose)  आणि आपल्या ताब्यात घेतलं. आता कोरोना लस घेतली म्हणून या व्यक्तीला अटक कसं काय केलं, याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. कोरोना लशीचे सध्या दोन डोस आणि त्यानंतर काही ठिकाणी किंवा काही विशिष्ट लोकांना बुस्टर डोस दिला जातो आहे. या व्यक्तीने मात्र हद्दच केली. त्याने कोरोना लशीचे तब्बल 90 डोस घेतले (Man Got 90 Covid Vaccine Jabs) आणि 91 वा डोस घेण्यासाठी ते कोरोना वॅक्सिनेशन सेंटरवर होता. हे वाचा - भारत बायोटेकला मोठा झटका! WHO ने लसीचा आंतरराष्ट्रीय पुरवठा थांबवला, काय आहे कारण डेली मेलच्या रिपोर्टनुसार या व्यक्ती 90 वेळा कोरोना लस घेतली ती कोरोना लसीकरण प्रमाणपत्रासाठी. सर्टिफिकेटवर खरा वॅक्सिन बॅच नंबर असायचा. त्यामुळे हे सर्टिफिकेट तो अशा नागरिकांना विकायचा ज्यांनी कोरोना लस घ्यायची नाही आहे पण त्यांना सर्टिफिकेट हवं आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केल्यानंतर तपासणी सुरू केली. कोरोना लसीचा ओव्हरोड घेतल्यामुळे या व्यक्तीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम झाला की नाही याबाबत माहिती नाही. दरम्यान हे पहिलं प्रकरण नाही. याआधी न्यूझीलँडमधील एका व्यक्ती 24 तासांत कोरोना लशीचे अधिक डोस घेतले होते. तर भारतात बिहारमध्ये एका 84 व्यक्तीनेही 11 कोरोना लशीचे डोस घेतले होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Lifestyle

    पुढील बातम्या