कोरोनाशी लढा देण्यासाठी गाझा पट्टीतील महिलेने तयार केलं मल्टी-टास्किंग निर्जंतुकीकरण यंत्र

कोरोनाशी लढा देण्यासाठी गाझा पट्टीतील महिलेने तयार केलं मल्टी-टास्किंग निर्जंतुकीकरण यंत्र

कसं काम करतं हे मल्टी-टास्किंग निर्जंतुकीकरण यंत्र...

  • Share this:

गाझा सिटी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पॅलेस्टिनी महिला व्यावसायिकाने तयार केलेल्या मल्टी-टास्किंग निर्जंतुकीकरण यंत्राद्वारे ग्राहकांचे स्वागत केले जाते. व्यक्तीचे तापमान घेताना त्यांच्या हातावर सॅनिटायजर फवारणी करणे, हे दोन मीटर (सुमारे 6.6 फूट) उंच यंत्र संपूर्णतः निर्जंतुकीकरणाचा अनुभव देतं. जर शरीराचे तापमान खूपच जास्त असेल तर एक लाल सिग्नल दिसेल. अन्यथा ग्राहकांना आत येऊ देण्यासाठी रेस्टॉरंटचा दरवाजा आपोआप उघडेल.

"गाझा पट्टीमध्ये आमच्याकडे तापमान मोजण्यासाठी परदेशातून आयात केलेली प्राथमिक साधने आणि इतर जंतुनाशक करणारी साधने आहेत, परंतु आमची उपकरणं एका यंत्रामध्ये अनेक तंत्रज्ञानांचा वापर करतात," असं यंत्राच्या निर्मात्या हेबा अल-हिदी यांनी एएफपीला सांगितलं.

2007 पासून इस्रायलच्या अधिपत्याखाली असलेल्या पॅलेस्टिनींच्या दाट लोकवस्ती सुरुवातीला कोव्हिड - 19 ने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं. परंतु गंभीर आर्थिक परिस्थिती, खराब आरोग्य यंत्रणा आणि विजेच्या तीव्र टंचाईमुळे गाझाला विशेषत: विषाणूचा धोका होता. 5440 जणांना बाधा आणि 31 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला "जेव्हा कोव्हिड - 19 गाझा पट्टीमध्ये पोहोचले तेव्हा मी स्वत: ला सांगितले की मला त्याचा प्रसार रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल.", असे हिदी म्हणाल्या.

'गाझामध्ये काहीतरी नवीन'

37 वर्षांय गणिताची पदवीधर असलेल्या हिदीने इनोव्हेशन मेकर्स नावाची कंपनी सुरू केली असून ती त्याची प्रमुख आहे. त्या कंपनीने अशी आठ अँटीकोव्हिड उत्पादने तयार केली आहेत ज्यात मुलांना आवाहन करण्यारी निळ्या आणि पिवळ्या रोबोटसारख्या यंत्राचा ही समावेश आहे. ती म्हणाली की या प्रकल्पातून पैसा मिळतो पण "आमचे लक्ष नफ्यावर नाही". "हा शोध जगाला दाखविण्यासाठी आहे, आम्ही गाझा पट्टीच्या वेढले असूनही आम्ही असं संशोधन करत आहोत हे जगाला दाखवून देण्यासाठी पॅलेस्टाईन उत्पादनं आणि पॅलेस्टाईनच्या संशोधनांवर लक्ष केंद्रित करीत आहोत."

इनोव्हेशन मेकर्सने विविध तंत्रज्ञानांवर अवलंबून आपली यंत्र $550 पासून $1500 ला सुपरमार्केट, बेकरी आणि रेस्टॉरंट्सला डझनभर यंत्रं विकली आहेत. इस्रायलच्या अधिपत्त्याखाली असलेल्या वेस्ट बँकमधील रामाल्लामध्ये असलेल्या पॅलेस्टाइनच्या अर्थ मंत्रालयाने या उत्पादनांना पेटंट दिलं आहे. स्थानिक बाजारातून सुटे भाग घेण्याचा प्रयत्न कंपनीने केला पण मेड इन गाझाचा प्रयत्न इस्रायलनी हाणून पाडला. टॅबुन रेस्टॉरंटला हे यंत्र पसंत पडलं आहे. गाझा इटरीचे हॉस्पिटॅलिटी मॅनेजर मतार मटीर यांनीही उत्पादनांचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा-शवपेट्यांना पॉलिश करायचं तर कधी दूधवाल्याचं काम करायचा पहिला जेम्स बाँड

संगणक अभियंता मोहम्मद नटाट (वय 23) यांनी सांगितले की यंत्र बनविणाऱ्या टीमचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. ते म्हणाले, "या कामात भाग घेण्याची आणि माझ्या क्षेत्रात सर्जनशील होण्याची संधी मला मिळाली. काही काम करण्याची मोठी संधी हवी होती." वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार गाझा लोकसंख्येच्या जवळपास अर्धी लोकसंख्या बेरोजगार आहे. त्यातील दोन तृतीयांश तरुण लोक आहेत

Published by: Meenal Gangurde
First published: October 31, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या