Home /News /coronavirus-latest-news /

खळबळजनक! रुग्णालयात माळी घेतोय कोरोना चाचण्या! सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने आली अशी वेळ

खळबळजनक! रुग्णालयात माळी घेतोय कोरोना चाचण्या! सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने आली अशी वेळ

येथील सांचीमधील एका सरकारी रुग्णालयातील माळीवर कोरोना चाचण्या घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कारण, रुग्णालयातील इतर सर्व स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे. माळी कोरोना चाचण्या घेत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

    भोपाळ, 14 एप्रिल : देशभरातील कोरोना स्थिती (Corona in India) अतिशय बिकट झाली असून बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडल्याचे दिसत आहे. विविध ठिकाणी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याने रुग्णांना बाहेर रस्त्यावर ऑक्सिजन टँक घेऊन बसण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशमधील (Corona in madhya pradesh) एका घटनेवरून आरोग्य व्यवस्था सध्या कोणत्या स्थितीत आहे, हे आपल्याला समजू शकेल. येथील सांचीमधील एका सरकारी रुग्णालयात माळी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर कोरोना चाचणी घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कारण, रुग्णालयातील इतर सर्व स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे. माळी कोरोना चाचण्या घेत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. धक्कादायक म्हणजे मध्यप्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ. प्रभुराम चौधरी (MP health minister Dr Prabhuram Chaudhary) यांच्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती आहे. मात्र, चौधरी दामोहमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये मग्न आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आता दिवसाला सहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. (हे वाचा - Corona उद्रेकाचा पंतप्रधान मोदी घेणार आढावा; सर्व राज्यपालांसोबत आज महत्त्वाची बैठक) मी माळी म्हणून येथे काम करतो आहे, मी कायमस्वरूपीचा कामगारही नाही मात्र रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत, त्यामुळे कोरोना चाचणी करण्याचे काम मी करत आहे, असे माळी हल्के राम यांनी सांगितले. यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राजश्री तिडके म्हणाल्या की, संबंधित माळी यांना चाचणी कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. आम्ही सध्या हतबल आहे, कारण इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, काम तरी बंद ठेवू शकत नाही. फार आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास कोणालाही कोरोना चाचणी करता यावी, यासाठी आम्ही सर्वांना प्रशिक्षण दिले आहे, त्यामुळेच हे माळी देखील चाचणी घेत आहेत. यावरून विरोधी काँग्रेस (MP Congress) पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे. कुणीही मला सांगावे की, आरोग्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजला गेल्या आठ दिवसात भेट दिली आहे. होय म्हणणाऱ्याला मी 11001 रुपयाचे बक्षीस देतो, अशी उपहासात्मक टीका काँग्रेस प्रवक्ते सैयद जफर यांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona spread, Corona updates, Corona vaccination

    पुढील बातम्या