मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

बाकीच्या लशी जातात कुठे? देशात महिन्याला 8.5 कोटी डोसची निर्मिती मात्र वापर केवळ 5 कोटी

बाकीच्या लशी जातात कुठे? देशात महिन्याला 8.5 कोटी डोसची निर्मिती मात्र वापर केवळ 5 कोटी

देशात सध्या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेच्या अधिकृत आकडेवारीत तफावत असल्याचं दिसत आहे. यानुसार, भारतात दररोज जवळपास 27 लाख लसीच्या डोसची निर्मिती होत आहे.

देशात सध्या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेच्या अधिकृत आकडेवारीत तफावत असल्याचं दिसत आहे. यानुसार, भारतात दररोज जवळपास 27 लाख लसीच्या डोसची निर्मिती होत आहे.

देशात सध्या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेच्या अधिकृत आकडेवारीत तफावत असल्याचं दिसत आहे. यानुसार, भारतात दररोज जवळपास 27 लाख लसीच्या डोसची निर्मिती होत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 मे : देशात कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढ्यात लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र, देशात सध्या लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेच्या अधिकृत आकडेवारीत गडबड असल्याचं दिसत आहे. हे सरकारी आणि लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये दिसून येत आहे. यानुसार, भारतात दररोज जवळपास 27 लाख लसीच्या डोसची निर्मिती होत आहे. यात स्पुतनिकचा समावेश नाही. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांमध्ये दररोज सुमारे 16.2 लाख डोसच दिले गेले आहेत. मात्र, असं असतानाही राज्य लसींचा तुटवडा असल्याचं म्हणत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारनं मे महिन्याच्या सुरुवातीला अशी माहिती दिली होती, की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशिल्ड लसीचे दर महिन्याला 6.5 कोटी डोस बनवत आहे. तर, भारत बायोटेक दर महिन्याला कोव्हॅक्सिनचे 2 कोटी डोस बनवत आहे. या आकडा वाढवून जुलै अखेरपर्यंत 5.5 कोटी करायचा आहे. यासोबतच अशीही माहिती देण्यात आली होती, की स्पुतनिकही जुलैपर्यंत दर महिन्याला 1.2 कोटी डोसची निर्मिती करेल.

सीरम इन्स्टिट्यूटनं स्वतःही अनेकदा अशी माहिती दिली आहे, की ते प्रत्येक महिन्याला 6 ते 7 कोटी डोसची निर्मिती करतात. भारत बायोटेकनंही असा दावा केला होता, की एप्रिल महिन्यात कंपनी दरमहा 2 कोटी डोस बनवत आहे. तर, मेमध्ये हा आकडा 3 कोटीवर पोहोचेल. या दोन्ही कंपनींचे दावे पाहिल्या, समजतं की मे महिन्यात या कंपन्यांनी 8.5 डोसची निर्मिती केली आहे. 31 दिवसांच्या या महिन्यात दररोज सुमारे 27.4 लाख डोस बनवले जात आहेत यावरुन हेदेखील दिसतं, की भारत बायोटेक अजूनही तीन कोटी नव्हे तर दोनच कोटी डोस बनवत आहे.

आता कोविन पोर्टलवरील आकडे पाहिल्यास असं दिसतं, की 1 मे ते 22 मे या काळात भारतात कोरोनाचे तब्बल 3.6 कोटी डोस नागरिकांना दिले गेले आहेत. याची प्रतिदिन सरासरी साधारण 16.2 लाख डोस आहे. यानुसार आकडेवारी काढल्यास मे अखेरपर्यंत केवळ ५ कोटी डोसचाच वापर होईल. अशात असा प्रश्न उपस्थित होतो, की उत्पादन 8.5 कोटी असतानाही केवळ 5 कोटी डोसच का दिले जात आहेत?

देशातील अनेक राज्यांनी लसीच्या तुटवड्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाआधीच हात वर केले. लोकांना लसीकरणासाठी स्लॉट उपलब्ध होत नाहीत. अशात शेवटपर्यंत हा सवाल उभा राहातो, की इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या लशींची नेमकं काय केलं जात आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine