• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • गंगाजलाने बरा होणार कोरोना रुग्ण; उपचारात प्रभावी ठरत असल्याचा संशोधकांचा दावा

गंगाजलाने बरा होणार कोरोना रुग्ण; उपचारात प्रभावी ठरत असल्याचा संशोधकांचा दावा

कोरोना उपचारात गंगाजलाच्या वापराबाबत केंद्र सरकारने आरोग्य विभागाला एक नोटीसही जारी केली आहे.

  • Share this:
लखनऊ, 13 सप्टेंबर : कोरोना महासाथ (Coronavirus) सुरू झाल्यापासून त्यावर उपचारांसाठी विविध प्रकारची संशोधनं करण्यात येत आहेत. जगभरातले वैज्ञानिक अजूनही कोरोनावर प्रभावी उपचारांसाठीचा (Effective treatment for corona) शोध घेत आहेत. यातच आता कोरोनावर गंगाजल हे प्रभावी (Ganga Jal for corona treatment) ठरू शकतं, असं एका संशोधनात समोर आलं आहे.  बनारस हिंदू विद्यापीठातले (BHU) डॉक्टर व्ही. एन. मिश्रा आणि डॉक्टर अभिषेक पाठक यांनी याबाबत दावा केला आहे. रविवारी (12 सप्टेंबर) प्रेस क्लबमध्ये घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज (Bacteriophage) मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बॅक्टेरियोफेजचा अर्थ ‘बॅक्टेरिया नष्ट करणारा’ (Bacteriophage kills other viruese) असा होतो. गंगेमध्ये असलेले हे बॅक्टेरियोफेजही विविध प्रकारच्या विषाणूंना नष्ट करू शकतात. यामुळेच गंगा नदीची शुद्धता (Purity of ganga river) कायम राहते. हिमालयाच्या गंगोत्रीमध्ये उगम होत असलेल्या गंगा नदीमध्ये जवळपास 1300 प्रकारचे बॅक्टेरियोफेज (Ganga river bacteriophage) आढळून आले आहेत. देशातल्या कोणत्याही नदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियोफेज नाहीत. विशेष म्हणजे बॅक्टेरियोफेज आपल्यासाठी हानिकारक (Bacteriophage not harmful for us) नसतात. हे वाचा - 'Corona ची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच', पण शाळा उघडण्याबाबत तज्ज्ञांचा इशारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता हेदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं, की जल शक्ती मंत्रालयाच्या (Jal Shakti Ministry) अंतर्गत असलेल्या स्वच्छ गंगा मिशनने (Swachh Ganga Mission) या क्लिनिकल स्टडीबाबत निर्देश दिले होते. या अंतर्गत कोरोनावरच्या उपचारांसाठी गंगाजलाचा वापर करता येईल का याबाबत संशोधन सुरू आहे. गुप्ता यांनी सांगितलं, की याबाबत त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad high court) एक जनहित याचिकाही दाखल केली आहे. त्यावर केंद्र सरकारने आरोग्य विभागाला एक नोटीस जारी केली आहे. ‘इंडिया डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यापूर्वी 'एम्स ऋषिकेश'ने (AIIMS Rishikesh) गंगा नदीच्या पाण्याची तपासणी केली होती. त्या वेळी या पाण्यात कोरोनाचे विषाणू टिकत नसल्याचं आढळून आलं होतं. ऋषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी (Ganga Jal tested for corona) करण्यात आली होती. त्यातून ही माहिती मिळाली होती. दरम्यान, कोरोनाच्या काही रुग्णांवर उपचारात बेंगळुरूच्या 'आयआयएम'मधले (Bengaluru IIM) निवृत्त प्राध्यापक आणि एक एनजीओ गंगाजलाचा (Ganga Jal for corona treatment) वापर करत आहेत. या चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. हे वाचा - कोरोनाच्या दोन डोसनंतर आता BOOSTER DOSE ची गरज? वाचा, तज्ज्ञांचं नेमकं मत हा प्रयोग यशस्वी झाल्यास, गंगाजलाच्या मदतीने कोट्यवधी लोकांवर इलाज (Treat Corona with Ganga Jal) करणं शक्य होणार आहे. तसंच, गंगाजल सर्वांत पवित्र असल्याच्या हिंदू संस्कृतीमधल्या दाव्यालाही वैज्ञानिक पाठिंबा मिळणार आहे.
First published: