मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करता येणार?, काय आहे वैज्ञानिकांचं मत वाचा सविस्तर

कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करता येणार?, काय आहे वैज्ञानिकांचं मत वाचा सविस्तर

या सगळ्यामध्ये वैज्ञानिकही आता कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर (Can Ganga Jal treat corona) करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत.

या सगळ्यामध्ये वैज्ञानिकही आता कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर (Can Ganga Jal treat corona) करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत.

या सगळ्यामध्ये वैज्ञानिकही आता कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर (Can Ganga Jal treat corona) करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत.

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: गंगा नदीमध्ये एकदा स्नान केल्यामुळे आपली सर्व पापं धुतली जातात असं म्हटलं जातं. गंगा नदीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीचं पाणी सर्वांत पवित्र (Ganga water considered holy) असल्याचं मानलं जातं. या सगळ्यामध्ये वैज्ञानिकही आता कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर (Can Ganga Jal treat corona) करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत. विशेष म्हणजे, गंगा नदीच्या पाण्याने कोरोना विषाणू मरत असल्याचेही एका अभ्यासात समोर आले आहे.

बीआरडी मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजिस्ट अमरेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लखनऊमधील नाल्यांमध्ये असलेल्या पाण्यात कोरोना विषाणू (Corona found in water) दिसून आले होते. त्यानंतर विविध ठिकाणच्या नद्यांमधील पाण्याची तपासणी सुरू करण्यात आली होती. एम्स हृषिकेशने (AIIMS Rishikesh) गंगा नदीच्या पाण्याची तपासणी केली असता, त्यात कोरोनाचे विषाणू टिकत नसल्याचे आढळून आले. हृषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी (Ganga Jal tested for corona) करण्यात आली आहे. यातून ही माहिती मिळाली.

गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजचे मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. अमरेश सिंह यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले, की गंगाजलामध्ये बॅक्टेरियोफेज (Bacteriophage virus) नावाचा एक बॅक्टेरिया आढळतो. हा विषाणू इतर विषाणूंना पाण्यात टिकू (bacteriophage kills other viruses) देत नाही. बॅक्टेरियोफेज हा हानीकारक (bacteriophage not harmful for us) नसतो. उलट तो इतर हानीकारक विषाणूंचा खात्मा करतो, ज्यामुळे गंगा नदीच्या पाण्यात कोरोनाही (Corona not found in Ganga) टिकू शकत नाही.

कोरोना व्हेरिएंट येतच राहणार कारण...; चीनच्या वुहान लॅबमधील 'बॅट वुमन'ने दिला इशारा

अमरेश यांनी सांगितले, की बंगळुरूच्या आयआयएममधील एक निवृत्त प्राध्यापक एका एनजीओसोबत मिळून गंगाजलापासून कोरोनावरील औषध (Corona Vaccine from Ganga Jal) बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत संशोधन सुरू असून, या संशोधन समितीमध्ये डॉ. अमरेशही आहेत. हे प्रामुख्याने बॅक्टेरियोफेजवर संशोधन करत आहेत. तसेच, कोरोनाच्या काही रुग्णांवर याची चाचणीही (Ganga Jal for COVID treatment) करण्यात येत आहे. या चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे अमरेश यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद, राज्यात वाढला मृतांचा आकडा; रिकव्हरी रेट 96.8

हा प्रयोग यशस्वी झाल्यास, गंगाजलाच्या मदतीने कोट्यवधी लोकांचा उपचार (Treat Corona with Ganga Jal) करणे शक्य होणार आहे. तसेच गंगाजल सर्वात पवित्र असल्याच्या हिंदू संस्कृतीमधील दाव्यालाही वैज्ञानिक पाठिंबा मिळणार आहे. गंगाजलापासून कोरोनावरील औषध (Corona Vaccine from Ganga Jal) तयार करता आल्यास, ती जगातील सर्वात स्वस्त लस ठरेल. त्यामुळे अगदी माफक दरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना, ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.

First published:

Tags: Corona patient, Corona vaccination, Coronavirus