नवी दिल्ली, 20 जून : कोरोना विषाणूविरोधात भारतात लसीकरणाचा दुसरा टप्पा (Coronavirus Vaccination) 21 जूनपासून सुरू होणार आहे. याअंतर्गत 18 वर्षांपुढील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 7 जून रोजी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार राज्यांना लशीची निर्मिती करणाऱ्या कंपनींकडून लस खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण केंद्र 75 टक्के लशींची खरेदी करणार असून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मोफत वितरण करणार आहे.
भारतातील पहिलं लसीकरण अभियान (Vaccination Programme) 16 जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत होतं. यादरम्यान केंद्र सरकारच्या नीतीनुसार त्यांनी लशींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून 100 टक्के लशींची खरेदी केली आणि त्यांना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मोफत दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे आणि 45 वयाहून अधिक नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं होतं. त्यानंतर मे महिन्यापासून केंद्राने उदारमतवादी धोरण (Liberalized Policy)लागू केलं आणि याअंतर्गत केंद्राने लशींची निर्मिती करणाऱ्यांकडून 50 टक्के लशींची खरेदी केली. तर उरलेले 50 टक्क्यांची खरेदी राज्य आणि खासगी रुग्णालयांनी प्रत्यक्षपणे कंपन्यांकडून केलं आहे.
हे ही वाचा-देशातल्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र राज्य कितवा? वाचा सविस्तर
लशींच्या खरेदीत केलेल्या बदलाबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, अनेक राज्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांना लशीची खरेदी आणि त्याच्या संचालनात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमावर परिणाम झाला आहे.
लोकसंख्या, कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरण या आधारावर लशी पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona vaccination