रुग्ण अक्षरशः मोठमोठ्यानं ओरडत होते, नातेवाईकांनी सांगितली भयाण घटना; ऑक्सिजन न मिळाल्यानं चौघांचा मृत्यू!

रुग्ण अक्षरशः मोठमोठ्यानं ओरडत होते, नातेवाईकांनी सांगितली भयाण घटना; ऑक्सिजन न मिळाल्यानं चौघांचा मृत्यू!

ऑक्सिजनच्या कमीमुळे (Shortage of Oxygen) सोमवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या कोविड रुग्णालयात गोंधळ उडाला होता. पुरवठा बंद झाल्यानं कोरोना रुग्ण (Corona Patients) अक्षरशः मोठमोठ्यानं ओरडत होते.

  • Share this:

जयपूर 21 एप्रिल: कोरोनाच्या (Corona) प्रसाराचा वाढता वेग पाहाता आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर (Ventilator) आल्याचं चित्र आहे. राजस्थानच्या कोटामध्ये दररोज दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरचा (Oxygen cylinder) वापर होत आहे. मात्र, तरीही अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याचं चित्र आहे. परिस्थिती अशी आहे, की रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. यातील बहुतेक रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

सोमवारी रात्री कोटा येथील मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता. यादरम्यान ऑक्सिजन सपोर्टवर असणारे रुग्ण अक्षरशः तडफडत होते. कोविड वार्डात भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा असा आरोप आहे, की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे तीन ते चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य विजय सरदाना यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजनच्या कमीमुळे सोमवारी रात्री मेडिकल कॉलेजच्या कोविड रुग्णालयात गोंधळ उडाला होता. असं सांगितलं जातं आहे, की इथे सुपर स्पेशालिटी ब्लॉक च्या 4-A मध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तीन ते चार रुग्णांचा मृत्यू झाला. वॉर्डमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं, की रात्री एक वाजता अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता. हा पुरवठा पहाटे साडेतीननंतर सुरळीत झाला.

मुंबईतील डॉक्टरचा Corona मुळे मृत्यू, फेसबुकवर दिले होते मृत्यूचे संकेत

मोडक येथील रहिवासी असलेल्या फरीद मोहम्मद यांनी सांगितलं,की ऑक्सिजन पुरवठा रात्री उशिरा अचानक बंद झाला. यानंतर घाई-घाईत हा पुरवठा सुरू करण्यात आला मात्र तोपर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. फरीद यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा नातेवाईक असलेल्या आसिफ हुसैननं ऑक्सिजनअभावी आपला जीव गमावला. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानंतर वॉर्डमधून रुग्णांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. वॉर्डात 25 हून अधिक रुग्ण होते.

रुग्णालयात दाखल काही रुग्णांची अशी तक्रार आहे, की ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रेशरनं केला जात नाहीये. यामुळे अनेकदा रुग्णांची स्थिती बिघडत आहे. कोटामधील कोविड रुग्णालयात 683 रुग्ण दाखल झाले आहेत. यातील 523 रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे.

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या इन्चार्जनं सांगितलं, की रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. जवळपास 500 हून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अशात ऑक्सिजनचा प्रेशर मेन्टेन करणं कठीण आहे. प्रत्येक पंधरा मिनिटाला ऑक्सिजन सिलेंडरची गाडी येत आहे. यामुळे कधी कधी रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 12:09 PM IST

ताज्या बातम्या