• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • तब्बल 4 महिने रुग्णालयात कोरोनाशी लढला; बरा होताच रुग्णालयाने दिलं 21 कोटींचं बिल

तब्बल 4 महिने रुग्णालयात कोरोनाशी लढला; बरा होताच रुग्णालयाने दिलं 21 कोटींचं बिल

कोरोना काळात अनेक रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याची प्रकरणंही आपण पाहिली आहेत. अनेक खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) अव्वाच्या सव्वा बिलं आकारली.

 • Share this:
  अमेरिका, 26 जून : भारतात (India) कोरोनाने हाहाकार माजवला आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. या कठीण काळात वैद्यकीय सुविधांअभावी अनेक रुग्णांनी प्राण गमावले. अनेक रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याची प्रकरणंही आपण पाहिली आहेत. अनेक खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) अव्वाच्या सव्वा बिलं आकारली. मात्र, रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याची प्रकरणं फक्त आपल्याच देशात घडतायत असं नाही. अत्यंत प्रगत देश असलेल्या अमेरिकेचाही याला अपवाद नाही. नुकतंच अमेरिकेत असं एक प्रकरण उघडकीस आलंय. अमेरिकेतल्या एका व्यक्तीनं तिथल्या महागड्या वैद्यकीय सुविधांबाबत (Expensive Medical Facility In America) जगाला सांगितलंय. टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर या व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आलेला खर्च लोकांना सांगितला आहे. कोरनामुळे तो 4 महिने रुग्णालयात दाखल होता. त्या कालावधीतलं त्याचं बिल तब्बल 20 कोटी 77 लाख रुपये आलंय. हे ही वाचा-कोरोनाबाधितांना मोदी सरकारचा मोठा दिलासा! उपचारासाठीचा इतका खर्च TAX FREE टिकटॉकवर @letstalkaboutbusiness नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेलाय. यामध्ये अमेरिकेतल्या रुग्णालयांचं कोरोना महामारीच्या काळातलं दरपत्रकदेखील दिसतंय. अॅनेस्थेशियापासून ते आयसीयूचं भाडं, मेडिकल आणि सर्जिकल उपकरणांच्या किमती आदी माहितीही त्यात दिली आहे. या व्यक्तीने म्हटलंय, की 4 महिने कोरोनाविरोधात लढा दिल्यानंतर तो वाचलाय; पण आता त्याला 21 कोटी रुपयांचं बिल भरावं लागणार आहे. दरपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेतल्या वैद्यकीय सुविधांचं दरपत्रक समोर आलंय. अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डशिवायच्या रूमसाठी तुम्हाला जवळपास 3 लाख 97 हजार रुपये द्यावे लागतील. शेअरिंग खोलीचं भाडं 3 लाख 67 हजार रुपये आहे. कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते आणि इथल्या रुग्णालयांमध्ये सर्वांत महाग उपचार रेस्पिरेटरी थेरपीचा आहे. या थेरपीसाठी रुग्णांकडून तब्बल 4 कोटी 8 लाख रुपये वसूल केले जातात. याशिवाय रुग्णालयांमधल्या इतर सुविधादेखील महाग आहेत. 4 महिन्यांचं बिल पाहून बसला धक्का या व्हिडिओत या व्यक्तीने सांगितलं, की चार महिने तो रुग्णालयात होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला रुग्णालयातल्या सुविधांचे दर पाहून धक्का बसलाय. आता त्याला 21 कोटी रुपयांचं बिल भरावं लागणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, की हा रुग्णालयाचा रेट चार्ट होता. इन्शुरन्सनंतर हे रेट कमी होतात. तुम्ही असं केलं नाही, तर तुम्हाला रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर कर्ज फेडावं लागेल. अमेरिकेच्या बॅकेर्स हेल्थकेयरच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसाच्या उपचारासाठी कमीत कमी एक लाख 76 हजार रुपये खर्च करावे लागतात.
  First published: