Home /News /coronavirus-latest-news /

Corona कहर: सांडपाण्याच्या नमुन्यात आढळला कोरोना व्हायरस! काय आहे नेमकं प्रकरण?

Corona कहर: सांडपाण्याच्या नमुन्यात आढळला कोरोना व्हायरस! काय आहे नेमकं प्रकरण?

 
मागील तीन दिवसांत मुंबईत 25 हजाराहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली होती. ती आता 13 हजारांवर घसरली आहे.

मागील तीन दिवसांत मुंबईत 25 हजाराहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली होती. ती आता 13 हजारांवर घसरली आहे.

WHO च्या माहितीनुसार, एखाद्या रहिवासी भागातील सांडपाण्यात कोरोना व्हायरस आढळला तर तेथील एक किंवा त्याहून अधिक लोक संक्रमित आहेत असे समजावं.

  चंडीगढ14 जानेवारी - कोरोना एकमेकांच्या जवळून संपर्कात आल्यास पसरतो, तो विषाणू हवेतून पसरणारा आहे. शिंक, खोकला यातले ड्रॉपलेट्स संसर्ग पसरवतात, ही माहिती आपल्याला Coronavirus बद्दल आतापर्यंत मिळाली आहे. पण Covid-19 ची साथ एवढ्या झटक्यात पसरण्याचं आणखी तर काही कारण नसेल?  पहिल्यांदाच सांडपाण्याच्या नमुन्यात कोरोना व्हायरस (Corona Virus) आढळला आहे. या नमुन्यांची तपासणी चंडीगढच्या पीजीआय व्हायरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये (Virology Department of PGI Chandigarh) करण्यात आली. पर्यावरणावर होणार्या कोरोनाच्या परिणामांना जोखण्यासाठी WHO-ICMR Centre ने अशी शिफारस केली आहे. चंडीगढमधील पीजीआय (PGI Chandigarh) मध्ये प्राध्यापक मिनी पी. सिंग म्हणाल्या, की आम्ही गेल्या डिसेंबर महिन्यापासून वेस्टवॉटर ट्रिटमेंट प्लँटमधून नमुने घेण्यास सुरुवात केली होती. चंडीगढसह अमृतसर, पंजाब (Amritsar, Punjab) च्या प्लॅंटमधूनही नमुने घेण्यात आले. प्रत्येक आठवड्यात नमुन्यांची तपासणी केली जात आहे. डिसेंबरमध्ये आमच्याकडे आलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरस (Corona Virus) आढळला नव्हता. परंतु आता संसर्ग वाढल्यानंतर चंडीगढच्या सांडपाण्यात कोरोना व्हायरस (Corona Virus) आढळला आहे. दिल्लीतील सिवेज ट्रिटमेंट प्लँट (Sewage Treatment Plants) मधूनही अशा प्रकराच्या तपासणीसाठी नमुने चंडीगढच्या पीजीआयमध्ये येऊ शकतात.

  Wuhan Lab मध्येच Corona व्हायरस तयार करण्यात आला, ई-मेलवरून झाला खुलासा

  तपासणीची प्रक्रिया जटिल ‘द ट्रिब्यून’च्या माहितीनुसार, सांडपाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीची पद्धत खूपच वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे माणसांच्या नमुन्यांच्या तपासणीच्या तुलनेत याची प्रक्रिया वेगळी असते. त्यासाठी आधी 2-3 एमएल सांडपणी तीन दिवस सुरक्षित ठेवून घट्ट होऊ दिले जाते. असं करणं खूपच आवश्यक आहे. सांडपाण्यात आढळणार्या संभाव्य व्हायरसला वेगळे काढण्यासाठी त्यातून न्यूलिक एसिड हटवून पाणी स्वस्छ केले जाते. नमुन्यांमध्ये व्हायरस आहे की, नाही हे तपासण्यासाठी या नमुन्यांचे आरटी-पीसीआर (RT-PCR) मशीनमध्ये तपासणी केली जाते. WHO च्या माहितीनुसार, एखाद्या रहिवासी भागातील सांडपाण्यात कोरोना व्हायरस आढळला तर तेथील एक किंवा त्याहून अधिक लोक संक्रमित आहेत असे समजावे.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Corona, Coronavirus

  पुढील बातम्या