Home /News /coronavirus-latest-news /

आधी आई...बाबा आणि मग भाऊ; एक-एक करीत अवघ्या 5 दिवसात कोरोना योद्ध्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

आधी आई...बाबा आणि मग भाऊ; एक-एक करीत अवघ्या 5 दिवसात कोरोना योद्ध्याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

दिवस-रात्र ड्यूटी करून नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचं अख्खं कुटुंब यात निधन पावलं

    अहमदाबाद, 23 नोव्हेंबर : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे अनेकांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. या बातम्या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. अहमदाबादमध्येही (Ahamadabad) अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या महासाथीत यांचं अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. अहमदाबादमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या धवल रावलच्या कुटुंबात कोरोनामुळे अवघ्या 5 दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. धवल रावल स्वतः एक कोरोना वॉरियर्स (Corona Warriors) असून अहमदाबादमध्ये ड्युटी करत आहेत. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत धवल रावल यांना गेल्या पाच दिवसांत आई-वडील आणि भाऊ यांच्या मृत्यूचा सामना करावा लागला आहे. प्रथम धवल रावत यांच्या आई-वडील कोरोनाची लागण झाली, त्यानंतर या दोघांना अहमदाबादच्या ठाकरनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु येथे तब्येत बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यादरम्यान त्यांच्या दुसऱ्या भावाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या पोलिसाला रूग्णालयात उपचाराच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिल द्यावे लागले, मात्र तरीही त्यांच्या कुटुंबातील तिघेही वाचू शकले नाहीत. पोलीस कॉन्स्टेबल धवल रावल यांची आई नयना रावल यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचेही कोरोनातच निधन झालं. त्यानंतर भाऊ चिराग रावलही कोरोनामुळे मरण पावला. हे ही वाचा-कोरोनाची लस तर तयार होईल, मात्र पुढील व्यवस्था सर्वात कठीण; तज्ज्ञ चिंतेत रुग्णालयात असताना त्यांची आई नयना रावल यांची प्रकृती खूप जास्त बिघडली होती. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती, ज्यामुळे त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तेथेही नयना रावल यांच्या प्रकृतीमध्ये फारसा फरक पडला नाही. नयना रावल यांचा 17 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईच्या मृत्यूतून सावरतो ना तोच त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनच गेली. आई-बाबाचं डोक्यावर छत्र हरपल्याने ते हताश झाले होते. अशात भाऊ हा एकमात्र आधार होता. मात्र त्यांच्या कुटुंबावरील संकट टळलं नव्हतं. दोन दिवसात भावाच्या मृत्यूची बातमी आली. म्हणजे पाच दिवसात त्यांच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आज-तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. धवल रावल हे धक्क्यातून सावरू शकलेले नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या भावाच्या मृत्यूमुळे त्यांचा आधारवड हरपला आहे. रविवारी गुजरातमध्ये कोरोना व्हायरसचे 1495 नवीन रुग्ण समोर आले आहेत आणि 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या