Home /News /coronavirus-latest-news /

Alert! Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा महाराष्ट्रात शिरकाव; एकाच दिवसात पुण्यात आढळले 7 रुग्ण

Alert! Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा महाराष्ट्रात शिरकाव; एकाच दिवसात पुण्यात आढळले 7 रुग्ण

Maharashtra First cases of omicron subvariants BA.4, BA.5 in Pune : महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या बीए व्हेरिएंटने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

    पुणे, 28 मे :  राज्यातील कोरोना प्रकरणं वाढत असताना आता झोप उडवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात ओमिक्रॉनच्या बीए सबव्हेरिएंटने शिरकाव केला आहे. BA.4, BA.5 व्हेरिएंट घुसला आहे. पहिल्यांदाच राज्यात या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. सर्व सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत (Maharashtra First cases of omicron subvariants BA.4, BA.5 in Pune). राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोरोना रिपोर्टनुसार राज्यात पहिल्यांदाच ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 सबव्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. BA.4 चे 4 आणि BA.5 चे 3 रुग्ण आहेत. हे सातही रुग्ण पुण्यात आढळल्याची माहिती सरकारने दिली आहे. पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णांच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेसिंग झालं. सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला आहे. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा आहे. याआधी भारतात हैदराबाद या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण सापडला होता. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे. हे वाचा -  तुमच्या त्वचेवर आलेले फोड कांजण्या की Monkeypox? अवघ्या एका तासात असं ओळखता येईल जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. 12 पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.  सीएनबीसीच्या मते, कोरोनाच्या WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कमीत कमी 16 देशांत BA.4 चे जवळपास 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. BA.5  चे 300 पेक्षा अधिक प्रकरणं 17 देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंच अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत. राज्यात पुन्हा 'कोरोनास्फोट'? राज्यात मे महिन्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसतो आहे. दिवसेंदिवस नवे रुग्ण वाढत चालले आहेत. दैनंदिन रुग्णांच्या आकडेवारी पाहता आता ठाकरे सरकारचीही झोप उडाली आहे (Maharashtra highest daily corona cases).  राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांनी 500 चा आकडा पार केला आहे. 28 एप्रिल 2022 च्या राज्याच्या आकडेवारीनुसार दिवसभरात  529 नवे रुग्ण सापडले आहेत. 5 मार्चनंतर एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. आता तशीच परिस्थिती पुन्हा आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत? काही दिवसांपूर्वी आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी एक संशोधन केले होते. त्यांच्या संशोधनानुसार, 22 जून 2022 रोजी भारतात कोविड-19 साथीच्या रोगाची संभाव्य चौथी लाट सुरू होऊ शकते. ऑगस्टच्या अखेरीस ही लाट उच्चांक गाठू शकते. प्रीप्रिंट रेपॉजिटरी MedRxiv वर शेअर केलेल्या माहितीनुसार, चौथी लाट शोधण्यासाठी सांख्यिकीय मॉडेल्सचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की संभाव्य चौथी लाट 4 महिने टिकू शकते. चौथ्या लाटेची तीव्रता देशभरातील नवीन कोरोनाव्हायरस आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे सांगितलं आहे. पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्ती झाल्याने नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या