Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus पासून वाचवण्यासाठी पुरुषांना दिले जात आहेत महिलांचे सेक्स हार्मोन

Coronavirus पासून वाचवण्यासाठी पुरुषांना दिले जात आहेत महिलांचे सेक्स हार्मोन

अमेरिकेत (America) कोरोना (coronavirus) रुग्ण असलेल्या पुरुषांना प्रायोगिक तत्वावर फिमेल सेक्स हार्मोन्स (female sex hormone) दिले जात आहेत. 

    वॉशिंग्टन, 29 एप्रिल : कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं आणि मृत्यूदराचा (coronavirus mortality rate) अभ्यास करता महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाव्हायरस आपला शिकार जास्त बनवत असल्याचं दिसून आलं आहे. महिलांमधील सेक्स हार्मोन्स यासाठी जबाबदार असू शकतात, असं मानून अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी आता महिलांचे सेक्स हार्मोन्स वापरून पुरुष कोरोना रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आकडेवारीनुसार, चीनमध्ये फेब्रुवारीत 2.8% पुरुष तर 1.7%  महिलांचा मृत्यू झाला. अमेरिकेत 5,700 कोरोना रुग्णांपैकी 60% पुरुष तर 40% महिला होत्या तर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांमध्येही 66.5% पुरुषच आहेत. इटली, फ्रान्स, यूके, जर्मनी आणि दक्षिण कोरियातही अशीच आकडेवारी आहे. यूकेने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालानुसार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण महिलांच्या तुलनेत दुपटीने मृत्यू होत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने जारी आकडेवारीही अशीच आहे. हे वाचा - Colon Infection : काय आहे हा आजार ज्याच्याशी लढत होते इरफान खान भारतातही पुरुष-महिलांवर कोरोनाव्हायरसचा असा वेगळा परिणाम का होतो आहे, हे समजण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईतील 68 कोरोना रुग्णांचे कोरोना टेस्ट नेगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या नाकातील नमुने घेण्यात आलेत. त्यानंतर दिसून आलं की, या रुग्णांपैकी महिला रुग्णांच्या शरीरातील व्हायरसचा जवळपास 4 दिवसांतच नाश झाला मात्र पुरुषांमध्ये व्हायरसचा लोड 6 दिवसांपर्यंत होता. हा अभ्यास medRxiv जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधीदेखील 2003 साली SARS आणि 2012 साली MERS या आजारांच्या उद्रेकावेळीही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मृत्यूदर जास्त होता. वेस्टर्न जर्नल ऑफ एमर्जन्सी मेडिसीनमध्ये (WJEM) याच महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अभ्यासात ही आकडेवारी देण्यात आली आहे. श्वसनसंबंधी आजारांमुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू जास्त होत असल्याने अशा आजारांना मॅन फ्लू (Man flu) असंही म्हटलं जातं. जेनेटिक संरचना असू शकते जबाबदार महिलांमधील जेनेटिक संरचना ज्यामध्ये दोन एक्स क्रोमोजोम, हेच यामागील कारण असावं असं मानलं जात आहे. X क्रोमोजोम्समध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवणारे जीन्स सर्वात जास्त असतात, मात्र Y क्रोमोजोम्समध्ये त्या तुलनेत कमी असतात. यामुळे आजाराशी लढण्यासाठी महिलांची रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा चांगलं काम करते. या थेअरीसह आता शास्त्रज्ञ सेक्स हार्मोन्सवर अभ्यास करत आहेत. आता शास्त्रज्ञ महिलांमधील सेक्स हार्मोन एक्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनमुळे व्हायरसपासून सुरक्षा देतात का हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत होत आहे प्रयोग न्यूयॉर्कच्या स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटीने (Stony Brook University) काही पुरुष रुग्णांचा महिलांमधील एस्ट्रोजेन हार्मोन वापरून उपचार करणं सुरू केलं आहे. तर लॉस एंजिलसमध्ये Cedars-Sinai Medical Center ने पुरुष रुग्णांना प्रोजेस्ट्रॉनचा सौम्य डोस सुरू केला आहे. यानंतर इतर पुरुष रुग्णांच्या तुलनेत महिलांचे हार्मोन्स देऊन उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीत काय बदल होत आहेत, हे तपासलं जाईल. हे वाचा - वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट न्यूयॉर्क टाइम्समधील एका रिपोर्टनुसार, या संशोधनाच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सारा (Dr Sara Ghandehari) यांनी सांगितलं, "पुरुषांच्या तुलनेत महिला या व्हायरसचा सामना खूप चांगल्याप्रकारे करत आहेत. गर्भवती महिला ज्यांच्यामध्ये दोन हार्मोन्सचा स्तर जास्त असतो, त्यांच्यामध्येही संक्रमणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळेच महिलांचे हार्मोन्स वापरून पुरुषांवर उपचार करण्याचा प्रयत्न होतो आहे" संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या