लॉकडाऊनमध्ये Family Planning चा विचार, सावधान!

लॉकडाऊनमध्ये Family Planning चा विचार, सावधान!

अशा परिस्थितीत Family planning विचार करणं योग्य आहे की नाही, याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊयात.

  • Share this:

लखनऊ, 12 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) लॉकडाऊन (Lockdown) आहे. लोकं घरात बंदिस्त झालीत. अशा परिस्थितीत काही दाम्पत्यांनी Family planning चा विचार करत आहेत. मात्र आता मुलांचा विचार करणं योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडलं आहे.याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेऊयात.

लखनऊतील डॉ. राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थेतील वरिष्ठ डॉ. सुदर्शन विजय यांनी सांगितलं, "जे नवे दाम्पत्य बेबी प्लान करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी हा फेज जाऊ द्यावा. अनेक संशोधनात थंडीत हा व्हायरस सक्रिय होईल असा दावा केला आहे. दाम्पत्य आता कन्सिव्ह करतील तर डिलीव्हरी थंडीत होईल आणि व्हायरस थंडीत पसरला तर डिलीव्हरीवेळी समस्या निर्माण होऊ शकतील."

अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

"लॉकडाऊनमध्ये एकत्र राहणारे दाम्पत्य शारीरिक संबंध ठेऊ शकतात, कारण ते एकाच परिस्थितीत राहतात त्यामुळे त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका नाही. मात्र तुम्ही घराबाहेर जात असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. जे लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात किंवा मल्टीपल पार्टनरशी संपर्कात येतात त्यांनी या काळात शारीरिक संबंध ठेऊ नयेत", असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Coronavirus : इथं चाललंय काय आणि यांना चिंता वेगळीच, म्हणे किसिंग सीनचं कसं?

तर लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. अनिता नेगी म्हणाल्या, "लॉकडाऊनमध्ये तुम्ही एकाच वातावरणात राहत असाल तर बेबी प्लान करण्यास हरकत नाही. बेबी कन्सिव्ह करण्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात महिलांच्या शरीरात वेदना होतात, चिडचिड होते आणि अशावेळी जर जोडीदार पूर्ण वेळ सोबत आहे तर मानसिक आधार मिळेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 13, 2020, 11:03 PM IST

ताज्या बातम्या