... म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट Facebook ने केली डिलीट

... म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट Facebook ने केली डिलीट

'अमेरिकेतील नागरिक फ्लू सोबत जगायला शिकले आहेत. इतकच नाही तर आता कोरोनासोबत जगणंही शिकत आहोत.'

  • Share this:

वॉशिंग्टन, 07 ऑक्टोबर : अनेकवेळा धोकादायक किंवा हिंसक पोस्ट फेसबुककडून डिलीट केल्या जातात. अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहात असतानाच आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. फेसबुकने कारवाई करत ट्रम्प यांची पोस्ट डिलीट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत एक पोस्ट लिहिली होती मात्र ही पोस्ट फेसबुकने हटवल्याची माहिती मिळाली आहे.

स्वत: कोरोनाशी लढत असलेल्या ट्रम्प यांनी प्लू पेक्षा कोरोना कमी धोकादायक असल्याचा पोस्टमध्ये दावा केला होता. त्यांनी या संदर्भात ट्वीट देखील केलं होतं. या पोस्टबाबत ट्वीटरकडून अनेक वेळा हा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर फेसबुकनं चक्क डोनाल्ड ट्रम्प यांची फेसबुक पोस्टच हटवली आहे.

हे वाचा-ऑक्टोबरमध्ये आली GOOD NEWS! 7 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट घटला

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवस डोनाल्ड ट्रम्प यांना प्रकृती बिघडल्यामुळे आर्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सध्या त्यांना व्हाइट हाऊसमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

CNN दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, अमेरिकेतील नागरिक फ्लू सोबत जगायला शिकले आहेत. इतकच नाही तर आता कोरोनासोबत जगणंही शिकत आहोत. फ्लूच्या तुलनेत कोरोना कमी धोकादायक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या पोस्टनंतर ट्वीटरनं ही पोस्ट हाइड केली असून संभ्रम निर्माण करणारी असल्याचा दावा केला तर फेसबुकनं ही पोस्टच हटवली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 7, 2020, 9:31 AM IST

ताज्या बातम्या