मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Explainer: कोरोनाची लस किती प्रभावी आहे? जाणून घ्या सविस्तर!

Explainer: कोरोनाची लस किती प्रभावी आहे? जाणून घ्या सविस्तर!

कोरोना लशीचा कार्यक्षमता दर कसा असेल? ही लस किती प्रभावी असेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

कोरोना लशीचा कार्यक्षमता दर कसा असेल? ही लस किती प्रभावी असेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

कोरोना लशीचा कार्यक्षमता दर कसा असेल? ही लस किती प्रभावी असेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

कोरोना (Covid – 19) महामारीमुळे संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण असून अद्यापही कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही.  कोरोनावर लस (Corona Vaccine) काढण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावर लस शोधण्यात त्यांना यश आले असून अनेक देशांमध्ये लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. या लसीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कोरोना लशीचा कार्यक्षमता दर कसा असेल? ही लस किती प्रभावी असेल याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.(How effective is the corona vaccine)

लोकांना असा विश्वास आहे की, 100 टक्के कार्यक्षमता दर असलेली लसच चांगली असते आणि त्यामुळे लसीचे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. या लसीबद्दल अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. अशामध्ये शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी एक स्केल सेट केला आहे, जो लस किती प्रभावी आहे हे दर्शवतो. खास गोष्ट म्हणजे हे नियम आजचे नाहीत. याला सुमारे एका दशकापूर्वी निश्चित केले गेले होते. सद्यस्थितीत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) कमीत कमी 50 टक्के कार्यक्षमता दर असलेल्या लसींना परवानगी दिली असल्याचे सांगितले होते. तर जाणून घेऊया लस दर आणि ते कसे निश्चित केले जातात.

कशी दिली जाते लस?

लस तयार करणे ही एक प्रक्रिया आहे. पण त्याचा परिणाम तपासण्यासाठी व्यक्तीला क्लिनिकल तपासण्या करुन घ्याव्या लागतात. साधारणता यामध्ये तीन टप्पे असतात. तपासण्या करताना त्या व्यक्तीला दोन प्रकारची लस दिली जाते. ज्यामध्ये एक खरी असते आणि दुसरी प्लासिबो म्हणजे आर्टिफिशियल असते. दोन्ही प्रकारच्या लशी दिल्यानंतर रुग्ण्याच्या आरोग्यावर काय परिणाम झालाय याचा अभ्यास केला जातो.

हे ही वाचा-ब्रिटिश नको पुणेरी हवी; भारतातील कोरोना लशीला जगात मागणी

उदाहरणाद्वारे जाणून घेऊया?

अमेरिकेतील फार्मा कंपनी फायझर (Pfizer) देखील भारतात मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीच्या ट्रायल्समध्ये 48 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. यामधील 170 जणं कोरोना पॉझिटिव्ह होते. आता कंपनीने फक्त 8 रुग्णांना लस दिली आणि 162 जणांना प्लासिबो म्हणजे आर्टिफिशियल लस दिली. या दरम्यान स्वयंसेवकांना म्हणजे लस घेणाऱ्यांना हे माहिती नसते की त्यांना कोणती लस दिली जात आहे.

या प्रक्रियेनंतर, कंपनीला असे आढळून आले की, प्लासिबो दिलेले स्वयंसेवक जास्त आजारी पडले. यानंतर दोन्ही समूहांमध्ये फरक दिसून आला. या फरकानुसार विशेषज्ज्ञ लसीची कार्यक्षमता दर निश्चित करतात. अशा परिस्थितीत जर खरी आणि प्लासिबो म्हणजे आर्टिफिशियल लस घेणाऱ्या समूहांमध्ये काही फरक नसल्यास या लसीला कुचकामी मानले जाते.(How effective is the corona vaccine) सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या लसीचा प्रभावी दर हा लस घेणाऱ्या आणि लस न घेणाऱ्या लोकामध्ये असलेल्या जोखमीच्या फरकाच्या तुलनेवरुन निश्चित केला जातो.

हे ही वाचा-मेंदूतही घुसतोय कोरोना; फु्फ्फुसांतील संसर्गापेक्षाही गंभीर अवस्था

सध्याच्या परिस्थितीत भारताने कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी देण्यास परवानगी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (serum institute) तयार करण्यात येत असलेल्या कोविशील्डच्या दोन डोसचा कार्यक्षमता दर 62 टक्के आहे. तर भारत बायोटेकच्या लसीचा (biotech vaccine ) डेटा नसल्यामुळे अनेक वाद निर्माण झालेत. परदेशी लशींकडे पाहिले तर फायझरचा दावा आहे की, त्यांच्या लसीची परिणामकारकता 95 टक्के आहे. तर मॉडर्नाच्या बाबतीत ही आकडेवारी 90-94.5 टक्के एवढी आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus