Corona In Maharashtra: तज्ज्ञांच्या पथकानं दौऱ्यानंतर सांगितलं प्रसार वाढण्याचं कारण

Corona In Maharashtra: तज्ज्ञांच्या पथकानं दौऱ्यानंतर सांगितलं प्रसार वाढण्याचं कारण

रविवारी राज्यात कोरोनाचे 11 हजाराहून (Coronavirus Latest Update) अधिक नवे रुग्ण आढळलेले असून हा आकडा चिंतेत भर घालणारा आहे. मात्र, कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र असताना अचानक ही परिस्थिती कशी उद्भवल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

मुंबई 08 मार्च : राज्यात कोरोना रुग्णांच्या (Corona Cases In Maharashtra) संख्येत घट होऊ लागल्यानं सगळ्यांनाच दिलासा मिळाला असतानाच अचानक आता कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील 5 राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं चित्र असून यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे 11 हजाराहून (Coronavirus Latest Update) अधिक नवे रुग्ण आढळलेले असून हा आकडा चिंतेत भर घालणारा आहे. मात्र, कोरोना आटोक्यात येत असल्याचं चित्र असताना अचानक ही परिस्थिती कशी उद्भवल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच केंद्र सरकारने पाठवलेल्या तज्ज्ञांच्या पथकानं राज्याच्या दौऱ्यानंतर याच्या कारणाबाबतचा खुलासा केला आहे.

कोरोना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याचं मोठं कारण, याविषयी लोकांच्या मनात नसलेली भीती असल्याचं या पथकानं सांगितलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सोबतच लोकलही सामान्यांसाठी सुरु झाली, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेतून होणारी गर्दी, सुविधा उपलब्ध झाल्यानं वाढलेला प्रवास या कारणांमुळे कोरोना झपाट्यानं वाढत असल्याचं या पथकानं म्हटलं. इतकंच नाही तर पथकानं आरोग्य यंत्रणा सुस्तावल्या असल्याचा ठपका ठेवत चाचण्या कमी झाल्याचंही स्पष्ट केलं.

हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकानं काही उपाययोजान करण्याचे सल्लेही दिले आहेत. पथकानं सांगितलं, की कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या भागांमध्ये प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल यावर लक्ष केंद्रित करावं तसंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. सोबतच लसीकरण सुरू ठेवण्याचा सल्लाही या पथकानं दिला.

तज्ज्ञांच्या या पथकानं 1 आणि 2 मार्च असे दोन दिवस राज्याचा दौरा करुन कोरोना स्थितीची पाहणी केली. या पथकामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीनं आपल्या अहवालात लग्नसराईचे दिवस आणि इतर कार्यक्रमांचाही संदर्भ दिला आहे. या कारणांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होत आहे. त्यामुळे, सरकारनं नियमांची काटेकोर अंमलबजावणी, चाचण्यांच्या संख्येत वाढ आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे लक्ष द्यावं, अशी सूचना देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली, परिणामी चाचण्यांची संख्या घटली तसंच आरोग्य यंत्रणाही सुस्तावली आणि कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं झाला, असं या समितीचं म्हणणं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 8, 2021, 7:41 AM IST

ताज्या बातम्या