Home /News /coronavirus-latest-news /

'या' देशात तयार होतोय सर्वात महागडा मास्क, किंमत ऐकून व्हाल हैराण

'या' देशात तयार होतोय सर्वात महागडा मास्क, किंमत ऐकून व्हाल हैराण

18 कॅरेट सोन्याने बनविलेल्या या मास्कमध्ये 3,600 ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट हिरे आणि एन 95 फिल्टर लावण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आणि संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन मास्क अनिवार्य करण्यात आले. रोज मास्क वापरायचे तर एकच वापरून कंटाळा येऊ नये म्हणून त्यात अनेक व्हरायटी तयार करण्यात आल्या. अगदी वेगवेगळ्या डिझाइनपासून ते लग्ना समारंभासाठी सोन्या-चांदीचे मास्कही बाजारात येत आहेत. कुठे हिऱ्यांचं डिझाइन असलेले तर कुठे सोन्याचं डिझाइन असलेले मास्क बाजारात उपलब्ध आहेत. जगभरात सध्या चर्चा आहे ती आणखीन एका मास्कची. इस्रायलमध्ये सर्वात महागडा सोन्याचा मास्क तयार करण्यात आला आहे. याची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जवळपास या मास्कची किंमत 1.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 11 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. सोनं आणि हिऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या या मास्कमध्ये N-95 फिल्टरही देण्यात आला आहे. इस्रायलमधील दागिने तयार करणाऱ्या एका कंपनेनं असा दावा केला आहे की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तो जगातील सर्वात महाग मास्क तयार करतो. ज्याची किंमत 1.5 मिलियन डॉलर्स आहे. या सोन्याच्या मास्कमध्ये हिरे देखील लावण्यात आले आहेत. हे वाचा-सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या आजचे दर डिझायनर इसाक लेव्ही म्हणाले की 18 कॅरेट सोन्याने बनविलेल्या या मास्कमध्ये 3,600 ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट हिरे आणि एन 95 फिल्टर लावण्यात आला आहे. हे खरेदीदाराच्या मागणीवर आधारित आहे. 'यवेल कंपनी'चे मालक लेवी म्हणाले की, खरेदीदाराच्या आणखी दोन मागण्या आहेत हा मास्क या वर्षाअखेरपर्यंत तयार व्हायला हवा आणि आतापर्यंत जगातील सर्वात महाग मास्क असायला हवा. या ग्रहकाची ओळख मात्र सांगण्यासाठी कंपनीने नकार दिला आहे. हे वाचा-एक अपघात अन् अख्ख्या समुद्राचं पाणी झालं काळं! 'या' देशानं जाहीर केली आणीबाणी हा उद्योगपती चिनी उद्योगपती आहे जो अमेरिकेत राहातो आणि जगातला सर्वात महागडा मास्क त्याच्याजवळ असावा असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे हा मास्क तयार करणं एक मोठं आव्हान असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या मास्कचं वजन 270 ग्राम आहे. यामध्ये 3600 काळे आणि पांढऱ्या रंगाचे हिरे वापरण्यात आले आहेत आणि 18 कॅरेटमध्ये हा मास्क तयार करण्यात आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Gold, Mask

    पुढील बातम्या