एकही कोरोना रुग्ण नसलेले जिल्हे व्हायरसचे हॉटस्पॉट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

एकही कोरोना रुग्ण नसलेले जिल्हे व्हायरसचे हॉटस्पॉट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं वेगवेगळ्या कालावधीत वाढतील, असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

बंगळुरू, 17 मे : देशात कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 90927  पोहोचली आहे, तर 2872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वेगवेगळ्या कालावधीत वाढतील आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं, असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियातील लाइफ कोर्स एपिडेमिओलॉजीचे प्रमुख प्राध्यापक गिरिधर आर बाबू यांनी ज्या जिल्ह्यात कोरोनाचं एकही प्रकरण नाही अशा जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. उदाहरण देत ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या दावणगेरे, चित्रदुर्ग आणि शिमोगा या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं कोणतंही प्रकरण नव्हतं. मात्र आता हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत"

हे वाचा - कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी

देशामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये समानता दिसून येणार नाही. या जागतिक महासाथीशी लढण्यासाठी योग्य देखरेख आणि योजना तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

बाबू म्हणाले, "पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोना संक्रमण झापाट्यानं वाढत आहे. या राज्यात मृत्यूदर कमी करण्याच्या योजना वेगळ्या असतील. तर दुसरीकडे इतर राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू शकतात, त्यासाठी आपण तयारीत राहायला हवं"

"आपल्याला 2 श्रेणीत राज्यांमध्ये देखरेख ठेवण्याची गरज आहे. जर असं नाही झालं तर भारताला इतर देशांच्या तुलनेत जे यश मिळालं आहे, ते कायम राहणार नाही.  प्रत्येक राज्य आता एका देशाप्रमाणे आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाव्हायरसचं संक्रमणात वाढ वेगवेगळ्या कालावधीत होईल. आपण कमी संक्रमण असलेल्या क्षेत्रामध्ये ही वाढ टाळू शकतो", असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - लॉकडाऊन 4.0 साठी केंद्राची नियमावली जारी, 31 तारखेपर्यंत या आहेत अटी

"वाढत्या प्रकरणांबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. मृत्यूदर कमी होणं हे लक्ष्य असायला हवं. जर नीट देखरेख झाली तर भरपूर प्रकरणं समोर येतील आणि आपण मृत्यूदर कमी करू शकू. यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं", असं ते म्हणाले.

संपादन - प्रिया लाड

First published: May 17, 2020, 8:53 PM IST

ताज्या बातम्या