बोकारो, 26 मे : झारखंडमधील (Jharkhand) बोकारोमध्ये (Bokaro) पंजाब नॅशनल बँकेची (Punjab National Bank) अमानवीय चित्र समोर आले आहे. पीएनबी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्याने छळवणुकीचा आरोप केला आहे. कोरोना संसर्गातून (corona virus) बरे झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना अपुऱ्या ऑक्सिजनचा सामना करावा लागत होता. मात्र असे असतानाही कर्मचाऱ्याला जबरदस्तीने ड्यूटीवर बोलावलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय वेतनाबाबतही त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात अद्याप पीएनबी बँकेकडून अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
ही घटना बोकारो सेक्टर 4 स्थित पंजाब नॅशनल बँकेतील आहे. येथे काम करणाऱ्या अरविंद कुमार यांनी सांगितलं की, ते काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांनी सांगितलं की, 10 दिवसांपर्यंत ताप होता, त्यानंतर ते ठीक झाले. मात्र त्यानंतरही त्यांच्या फुप्फुसात कोरोना संसर्गाचा परिणाम दिसत होता. 10 दिवसांनंतरही ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. अरविंद यांनी आरोप केला आहे की, अशा परिस्थितीतही बँकेतून त्याला कामावर बोलावले जात आहे. शेवटी वैतागून त्याने राजीनामा दिला, मात्र त्याचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही.
हे ही वाचा-
बोकारो Punjab National Bank कर्मचारी अरविंद कुमार कुछ दिन पहले कोरोना से संक्रमित हो गए थे। ठीक होने के बाद उनके लंग्स में इंफेक्शन हो जाने की वजह से उन्हें ऑक्सीजन सपोर्ट में घर में ही इलाज चल रहा है। ऑक्सीजन सपोर्ट में रहने के बाद भी बैंक में काम करने के लिए बुलाया जाता है। pic.twitter.com/cVMnxKe7rb
— Haribansh (@Hariban84424968) May 26, 2021
बोकारे सेक्टर 2 मध्ये राहणारे बँक कर्मचारी अरविंद कुमार यांना श्वास घ्यायला त्रास येत होता. बँकेकडून वारंवार बोलावलं जात असल्याने ते ऑक्सिजन सपोर्टवर असताना बँकेत पोहोचले. अरविंद यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. अरविंद ऑक्सिजन सिलेंडरसह तोंडावर मास्क लावून बँकेत पोहोचले. बँकेत अरविंदला पाहून सर्वजण चकीत झाले. बँकेत बराच काळ गोंधळ झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Pnb bank