Dussehra 2020 : Covid-19 संकटादरम्यान घरामध्येच सुरक्षितपणे सण कसा कराल साजरा?

Dussehra 2020 : Covid-19 संकटादरम्यान घरामध्येच सुरक्षितपणे सण कसा कराल साजरा?

अनोख्या पद्धतीने साजरा करा सण..

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर :  यावर्षी, दसरा रविवारी, 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान राम यांनी रावण आणि त्याचे भाऊ मेघनाद आणि कुंभकर्ण यांचं वध करून असूर शक्तींवर विजय मिळवल्याचा हा उत्सव साजरा केला जातो. सामान्य परिस्थितीत, तिन्ही राक्षसांच्या पुतळ्याचे दहन करून या दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक विधीनुसार अनेक मोकळ्या जागी दसरा साजरा करायला लोकांचा मोठा जमाव झाला असता.

परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस आजाराच्या भीतीमुळे यावर्षी गोष्टी पूर्णपणे भिन्न असतील. सरकारने मोठ्या प्रमाणात लोकांना जमा होण्यास बंदी घातली आहे आणि लोकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व इतरांसाठीही घरी रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.असं जरी पहिल्यांदाच घडले असेल तरीही याचा अर्थ असा नाही की एखाद्याने उत्सव साजरा नाही केलं पाहिजे. घरी असतानाही हा उत्सव खास होऊ शकतो.

दसरा 2020 विशेष बनविण्यासाठी आपण करु शकता अशा काही गोष्टी:

1. उत्सवासाठी नवीन कपडे घालून तयार होणे

आपल्या वॉर्डरोबमधील एखादं छान असा भारतीय पारंपरिक पोशाख घालण्याचा हा दिवस असतो. अगदी तसंच तय्यार व्हायचं जसं दरवर्षी आपण सणासाठी बाहेर जायला तयार होतो. हे आपल्याला उत्सवाची भावना अबाधित ठेवण्यास मदत करेल.

2. आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत झूम कॉल आयोजित करा आणि आनंद मिळवा

सण हे सर्व मित्र आणि कुटुंबासोबत साजरे करायचे असतात. या वर्षी तर त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही, म्हणूनच एक आभासी भेट आयोजित करा. आपल्या कुटुंबाला व मित्रांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्हर्चुअल मिठ्या मारून द्या.

3. नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी रुचकर खाद्यपदार्थ तयार करा

कोणत्याही भारतीय उत्सवाचा एक महत्वाचा घटक म्हणजे पदार्थ. म्हणूनच, उत्सवाचा उल्हास कायम असणे सुनिश्चित करण्यासाठी आपण निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करू शकता.

4. दसऱ्याला आपण प्रियजनांना सोशल मीडियावर शुभेच्छा द्या

आपण आपल्या जवळच्यांना दसरा 2020 थीम असलेली स्टिकर्स आणि जीआयएफ पाठवू शकता. सर्वांना शुभेच्छा देत दासऱ्याचा उत्साह वाढवत राहा.

5. दसऱ्यावर आधारित चित्रपट बघा

दरवेळी सारखं ह्या वेळी बाहेर पडायला मिळणार नसल्यामुळे कुटुंबासह घरातच चांगला वेळ घालवण्यासाठी हा सण एक उत्तम प्रसंग आहे. या वर्षी आपण जत्रेत जाऊ शकत नाही म्हणून, आपण आपल्या कुटुंबासोबत दसऱ्यावर आधारित एखादा चित्रपट पहायचं ठरवा. हा दिवस आपल्यासाठी उज्ज्वल बनेल आणि उत्सवाचा उल्हासदेखील अबाधित राहील असे सर्व प्रयत्न करा.

Published by: Meenal Gangurde
First published: October 24, 2020, 7:32 AM IST

ताज्या बातम्या