Covishield च्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढवणार! प्रभाव अधिक होण्याच्या दृष्टीनं निर्णय

Covishield च्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढवणार! प्रभाव अधिक होण्याच्या दृष्टीनं निर्णय

स्टडीमध्ये असं समोर आलं आहे, की दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लस (Corona Vaccine) अधिक प्रभावी ठरते. लसीच्या डोसबाबतचा हा निर्णय पॅनल पुढच्या आठवड्यात घेऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली 07 मे : भारतात (India) सुरू असणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणादरम्यान (Third Phase of Corona Vaccination) सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. न्यूज 18 ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या विशेषतज्ज्ञांचं एक पॅनल ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca) लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा विचार करत आहे. एका आंतरराष्ट्रीय स्टडीदरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारी पॅनल हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. स्टडीमध्ये असं समोर आलं आहे, की दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लस अधिक प्रभावी ठरते.

लसीच्या डोसबाबतचा हा निर्णय पॅनल पुढच्या आठवड्यात घेऊ शकतं. मार्चमध्ये द लैंसेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन डोस सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ 55.1 टक्केच होतो.

अनेक देश लसीकरणाच्या दोन डोसमध्ये मोठं अंतर ठेवत आहेत. ब्रिटनमध्ये हे दोन्ही डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं दिले जात आहेत. तर, कॅनडामध्ये हे अंतर 16 आठवड्यांचं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही डोसच्या मध्ये ठेवण्यात येणाऱ्या अंतरामुळे प्रतिकारशक्ती वाढते. कंपनीनंही असा दावा केला आहे, की लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास त्याचा प्रभाव 28 टक्क्यांनी वाढतो.

कोरोनाकाळात दुहेरी संकट! BMC डॉक्टरांचा संपाचा इशारा, पगारवाढीचा प्रश्न ऐरणीवर

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर याआधीच 4-6 आठवड्यांवरुन वाढवून 6-8 आठवडे करण्यात आलं होतं. तज्ज्ञांनी एप्रिल महिन्यातच याबाबत निर्णय घेतला होता. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की यामुळे लसीच्या पुरवठा साखळीवरील दबावही कमी होण्यास मदत होईल. या गोष्टीचा लसीकरणाच्या नव्या टप्प्यात फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

तिसऱ्या टप्प्यात सरकारनं अठरा वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. 6 मे ला सकाळपर्यंत भारतात 16.25 कोटीहून अधिकांना लस दिली गेली आहे. तर, 18-44 वयोगटातील 9 लाखाहून अधिक जणांना लसीचा डोस मिळाला आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 7, 2021, 11:57 AM IST

ताज्या बातम्या