Home /News /coronavirus-latest-news /

Lockdown: विदारक दृश्यांची पुनरावृत्ती! रिक्षा, ट्रक किंवा चालतच महाराष्ट्र सोडतायंत हातावर पोट असणारी माणसं

Lockdown: विदारक दृश्यांची पुनरावृत्ती! रिक्षा, ट्रक किंवा चालतच महाराष्ट्र सोडतायंत हातावर पोट असणारी माणसं

गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाकार (Coronavirus 2020) संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown 2020) महाराष्ट्रात कामधंद्यासाठी आलेल्या अनेकांनी आपापल्या राज्यात परतायला सुरुवात केली होती. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होताना दिसत आहे. (फीचर फोटो-सांकेतिक)

पुढे वाचा ...
  मुंबई, 11 एप्रिल: गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाकार (Coronavirus 2020) संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown 2020) महाराष्ट्रात कामधंद्यासाठी आलेल्या अनेकांनी आपापल्या राज्यात परतायला सुरुवात केली होती. मिळेल ते वाहन पकडून, चालत ही हातावर पोट असणारी माणसं त्यांच्या घरी पोहोचत (Migration) होती. त्यावेळी अनेक व्हिडीओ-फोटो व्हायरल झाले होते, आणि ते चित्र फार भयंकर होतं. यात लोकांची उपासमार झाली, उन्हाळ्याचा त्रास झाला, चालत दूरवर गेल्याने मृत्यूही झाले. आर्थिक चणचण तर होतीच. या काळात कोरोनाबरोबरच उपासमारीने अधिक माणसांचा मृत्यू झाला होता. दरम्यान हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होताना दिसत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ-फोटो व्हायरल होत आहे. ज्यात असं पाहायला मिळतं आहे की, आता राज्यात लॉकडाऊनची (Possibility of Lockdown in Maharashtra) परिस्थिती असल्याने अनेकजण मिळेल ते साधन वाररून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार इ. या राज्यांमध्ये पोहोचत आहे. काही जण तर रिक्षाने किंवा चार-पाच गाड्या बदलून किंवा अगदीच पर्याय नसेल तर चालत घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण सध्या या कुणालाच त्यांची नोकरी किती काळ टिकेल याची शाश्वती राहिली नाही आहे. (हे वाचा-Indian Railways: संभावित लॉकडाऊनमुळे पुन्हा धावणार श्रमिक ट्रेन्स?) दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार इंदूरमध्ये राऊ सर्कलजवळ शुक्रवारी दुपारी एक ट्रक येऊन पोहोचला. त्यामधून आलेल्या उपेंद्र कुमार यांनी अशी माहिती दिली की ते आदल्या दिवशी तळेगावहून निघाले आहेत. पत्नीबरोबर आलेल्या कुमार यांना झाशी गाठायची होती. कार, बस, टेम्पोने त्यांनी सेंधवा गाठलं आणि त्यानंतर पुढचा प्रवास ट्रकने केला. फॅक्टरीमध्ये गाडी चालवणाऱ्या उपेंद्र कुमार यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नसल्याने त्यांनी घरी पोहोचण्याचा निर्णय घेतला. याच ट्रकमधून आलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितलं की ते पुण्यापासून पाच गाड्या बदलत सेंधवा पर्यंत पोहोचले आहेत. घरी कधी पोहोचतील याबाबत त्यांना काहीच कल्पना नाही. गुजरातहून कानपूरला जाण्याऱ्या एका व्यापाऱ्याचीही अशीच कहाणी आहे. कपड्यांचा व्यापार बुडाल्यामुळे त्यांनी बाइकवरुनच घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की यावेळी त्यांना सेंधवा बॉर्डरजवळ जवळपास 200 हून अधिक लोक चालत आपापल्या घरी परतताना दिसली आहेत. (हे वाचा-कोरोनामुळे वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास मुलाचा नकार, मुस्लीम तरुणाने दिला अग्नी) या मीडिया अहवालानुसार अलाहाबादचे असणारे संजय पटेल मुंबईत ऑटो चालवतात. त्यांचा हा व्यवसाय कोरोनामुळे प्रभावित झाल्याने त्यांनी परिवारासह पुन्हा अलाबाद गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ऑटोरिक्षातूनच अलाहाबादला पोहोचण्याचा निर्णय घेतला. या सर्व कहाण्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुन्हा एकदा हातावर पोट असणारे कामगार त्यांच्या घरी परतत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यात मीरारोडला राहणारी ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते देखील ऑटो रिक्षातून ही सगळी दृश्य पाहता, इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा भास निर्माण होत आहे. अशावेळी प्रश्न असा उपस्थित राहतो आहे की केंद्र सरकार किंवा संबंधित राज्य सरकार यावेळी काय उपाययोजना करणार? महाराष्ट्रात जर लॉकडाऊनची घोषणा झाली तर या कामगार, रिक्षाचालक, व्यापारी यांच्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील?

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Lockdown

  पुढील बातम्या