मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

बायकोसोबतच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे आले होते प्रसिद्धीझोतात, डॉक्टरचं कोरोनानं निधन

बायकोसोबतच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे आले होते प्रसिद्धीझोतात, डॉक्टरचं कोरोनानं निधन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे  (IMA) माजी संचालक आणि पद्मश्री डॉ. के के अग्रवाल (Dr K K Aggarwal Passes Away) यांचं सोमवारी रात्री निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून तो कोरोनासोबत (Coronavirus) लढा देत  होते.

  • Published by:  Kiran Pharate

 नवी दिल्ली 18 मे: इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी संचालक आणि पद्मश्री डॉ. के के अग्रवाल (Dr K K Aggarwal Passes Away) यांचं सोमवारी रात्री निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून तो कोरोनासोबत (Coronavirus) लढा देत होते. संसर्ग गंभीर झाल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. के के अग्रवाल यांनी स्वत: काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरद्वारे (Twitter) माहिती दिली होती, की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचं निधन हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठा तोटा आहे.

डॉ. के के अग्रवाल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, 'डॉ केके अग्रवाल यांचं 17 मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या कोरोनासोबत मोठी झुंज दिल्यानंतर निधन झालं आहे. डॉक्टर झाल्यापासून त्यांनी आपलं जीवन लोक आणि आरोग्यविषयक जागरुकतेसाठी समर्पित केलं.

डॉ के के अग्रवाल आपल्या कामामुळे प्रसिद्ध होतेच मात्र सोबतच ते आपल्या स्वभावामुळेही ओळखले जात. कोरोना काळात त्यांचं मोठं मन सर्वांनी पाहिलं. या संकटकाळात त्यांनी हजारो लोकांची मदत केली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्यांवर त्यांनी मोफत उपचार केले. कोरोना संकटाच्या काळात वॉरियर म्हणून ते काम करत राहिले. मात्र, त्याच कोरोनानं त्यांचा जीव घेतला. अग्रवाल हे मध्यंतरी आपल्या बायकोसोबतच्या एका व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांचा हा लसीकरणाबाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

व्हिडिओच्या माध्यमातून करायचे जनजागृती -

पद्मश्रीनं सम्मानित वरिष्ठ हृदयरोग विशेषतज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी याबद्दल माहिती दिली होती की कोणत्या लोकांना कोरोना संसर्गापासून अधिक धोका नाही आणि कोणाला याचा सर्वाधिक धोका आहे. याशिवाय त्यांनी सतत व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कोरोनाविषयी जागरुक केलं होतं.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Covid-19, Doctor contribution