• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • बापरे! Lockdownच्या काळात दुप्पट झाल्या आत्महत्या, ही 5 कारणं ठरली जीवघेणी

बापरे! Lockdownच्या काळात दुप्पट झाल्या आत्महत्या, ही 5 कारणं ठरली जीवघेणी

नैराश्य हा आजार आहे हे अनेकांना माहितच नसतं. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात हेही अनेकांना माहितच नाही. त्यामुळे लोक त्या विषयी बोलत नाहीत.

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून: कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी देशात अडीच महिने Lockdown लावण्यात आला होता. त्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले. हातावर पोट असलेल्या लोकांचं जीवन संकटात सापडलं होतं. या काळात आत्महत्या आणि कौटुंबीक हिंसाचारात (Domestic violence) वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं उघड झालं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (National Women Commission) महिलांवरच्या अत्याचारात मोठी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. छोटे व्यवहार बंद पडले हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे नैराश्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली जातेय. या आत्महत्येसाठी प्रमुख 5 कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने अनेकांचं उत्पन्नाचं साधन बंद झालं. त्यामुळे उपजिविकेचं साधन गेल्याने नैराश्य आलं. उत्पन्न बंद झाल्याने भविष्यात कसं होणार या चिंतेने अनेकांनी हे टोकाचं पाऊल उचललं. कोरोनामुळे सगळीकडेच नैराश्याचं वातावरण होतं. या काळात हळव्या मनाची माणसं अधिकच खचली. त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण अने कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे डोक्यावरचं कर्ज आणि कुटुंबांचा भार या ताणातून आत्महत्येचा मार्ग निवडला. नैराश्य हा आजार आहे हे अनेकांना माहितच नसतं. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात हेही अनेकांना माहितच नाही. त्यामुळे लोक त्या विषयी बोलत नाहीत. सगळं मनातच ठेवतात. त्यावर उपचार झाले तर अनेकांचे जीव वाचलीत असं डॉक्टरांचं मत आहे. नाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट, दिली ही भावुक प्रतिक्रिया तर लॉकडाउनच्या काळात पती पत्नी घरातच असल्याने त्यांच्यातल्या भांडणांमध्ये वाढ झाली आणि त्याचं पर्यवसन हे हिंसाचारात झालं त्याचा महिलांना सर्वात जास्त फटका बसल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.  
  First published: