मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

जपानमध्ये स्पर्धा झाली तर जगभर पसरेल कोरोनाचा महाभयानक 'ऑलिम्पिक स्ट्रेन'; डॉक्टर्स संघटनेचा इशारा

जपानमध्ये स्पर्धा झाली तर जगभर पसरेल कोरोनाचा महाभयानक 'ऑलिम्पिक स्ट्रेन'; डॉक्टर्स संघटनेचा इशारा

ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश होणार?

ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश होणार?

Japan Olympic 2021: ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोनाचा विषाणू जर म्युटेट झाला तर ही स्थिती चिंता वाढवणारी असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

टोकियो (जपान), 27 मे : जपानमध्ये (Japan) यावर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे (Olympic Games) आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघ स्पर्धा पार पडावी यासाठी प्रयत्नशील असून, देशातील बहुसंख्य नागरिक या स्पर्धेच्या आयोजनाच्या विरोधात आहेत. यातच जपानमधील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेनं ऑलिम्पिकच्या अनुषंगाने गंभीर इशारा दिला आहे. या संघटनेचे अध्यक्ष नाओतो उयामा यांनी याबाबत सांगितले की टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सहभागी होण्यासाठी जगभरातील क्रीडा रसिक जपानमध्ये दाखल होतील. मात्र कोरोनाच्या ऑलिम्पिक स्ट्रेनचा संसर्ग यामुळे वाढण्याची शक्यता आहे.

नाओतो उयामा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 200 देशांमधील खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जपानमध्ये येतील. मात्र कोरोनाच्या या स्थितीत स्पर्धेचं आयोजन धोकादायक ठरू शकतं. वेगवेगळ्या ठिकाणी विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन अस्तित्वात आहेत.

Explainer: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

 या स्ट्रेनला टोकियोत म्युटेट होण्याची संधी मिळू शकते. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर कोरोनाचा नवा स्ट्रेन उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी स्थिती निर्माण झाली तर त्याचा अर्थ असा होईल की कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनला ऑलिम्पिकचे (Olympic Strain) नाव दिले जाईल. या घटनेवर पुढील 100 वर्षे टीका होत राहिल आणि ही बाब देशाला त्रासदायक ठरू शकेल.

परदेशी प्रेक्षकांना जपानमध्ये येण्यास बंदी

डॉक्टर्स संघटनेने (Doctors Union) दिलेल्या इशाऱ्यानंतर जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना टोकियो ऑलिम्पिकच्या सुरक्षित नियोजनात गुंतले आहे. सध्या हा देश कोरोनाच्या चौथ्या लाटेला सामोरा जात आहे. अनेक राज्यांमध्ये 31 मेपर्यंत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

'कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी प्रयत्न वेगात करा' राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आदेश

सद्यःस्थिती पाहता ही मुदत आणखी वाढवण्याचा विचार सरकार करीत आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या परदेशातील प्रेक्षकांवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. स्टेडिअमवर कोणाला प्रवेश द्यायचा याबाबत पुढील महिन्यात निर्णय होणार आहे. जपानमध्ये आतापर्यंत केवळ 5 टक्के नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था दबावाखाली

जपानमधील डॉक्टरांची संघटना टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनामुळे चिंतेत आहे कारण यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था (Medical System) अद्यापही मोठ्या तणावात आहे. केवळ ओसाकामध्ये गंभीर कोरोना रुग्णांसाठी स्थापन केलेल्या 348 रुग्णालयांमध्ये 96 टक्के बेडसचा वापर गेल्या आठवड्यात करण्यात आला आहे. अशा स्थितीत जर ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोनाचा विषाणू जर म्युटेट झाला तर ही स्थिती देशाची चिंता वाढवणारी असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

-

First published:

Tags: Coronavirus, Japan, Olympic